अधिक मास आणि विष्णूसहस्त्रनामाचे महत्त्व!
ईश्वराला उद्देशून व्रत, उपवास, पूजा, होमहवन, दानधर्म इत्यादी शुभ मानले आहे. भगवंताचा पूर्ण अवतार म्हणजे चराचरात त्याचीच सत्ता आहे. त्याच्याशिवाय सष्टीतील कोणतेच कार्य संभव नाही. आपल्या देहात पण तोच आहे. त्याच्यामुळेच देहाचे सगळे व्यापार चालतात. त्याच्या अभावाने हा देह चैतन्यशुन्य म्हणजे मृतदेह होय. त्याच्यामुळेच हा देह चैतन्ययुक्त आहे.
अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे नाव देऊन श्रीकृष्णाने त्याचा गौरव केला आहे. प्रथम हा अधिक मास का येतो, हे बघू या. आपल्याला माहित आहे, की पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा एका वर्षात म्हणजे ३६५ दिवस आणि ६ तासात पूर्ण करते. यात जानेवारी ते डिसेंबर असे बारा महिने होतात. हे आपण जाणतो, याला सारवर्ष म्हणतात.
आपण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पोष, माय आणि फाल्गुन असे बारा महिने जागतो. आपले सण, व्रत-वैकल्ये या महिन्याप्रमाणे चालतात. जसे दसरा हा सण नेहमी अश्विन महिन्यात, होळी फाल्गुनमध्ये, जन्माष्टमी, पोळा हे सण श्रावणात येतात. गडीपाडवा हा चैत्र महिन्यात येतो. हे सगळे सण चादवर्षाप्रमाणे चालतात. चंद्रहा पृथ्वीचा उपग्रह, पृथ्वीभोवती साधारणपणे २९ दिवसात एक प्रदक्षिणा करतो. त्याच्या १२ प्रदक्षिणा पूर्ण झाल्या की एक वर्ष होते. ज्याला चाद्रवर्ष म्हणतात. परतु है चाद्रवर्ष ३५४ दिवसात पूर्ण होते. तेव्हा सारवर्ष व चाद्रवर्षात ११ दिवसाचा फरक येतो.
म्हणजे एक सारवांमध्ये चाद्रवर्ष ११ दिवसानी लहान, तर दोन वर्षात ते २२ दिवसानी छोटे, तर तीन वर्षांनतर ३३ दिवसानीचाद्रवर्ष लहान होते. हे ३३दिवस म्हणजे १ महिना व ३ दिवस होय. म्हणून दर ३३ महिन्यानंतर एक मास जास्तीचा पकडावा लागतो. तो जास्तीचा महिना म्हणजे अधिक मास होय. या महिन्यात सूचि रशातर होत नाही. म्हणजे सूर्य दुसन्या राशीत प्रदेश करत नाही. अश्विन महिन्यातील दसरा हा सण अश्विन मासातच येतो. हा जर अधिक महिना धरला नसता, तर दसरा हा सण उन्हाळ्यात एप्रिल किया में महिन्यात असता. उन्हाच्यातील सण गुढीपाडवा, अक्षयतृतिया वगरे आपल्याला हिवाळ्यात साजरे करावे लागले असते. तसे होऊ नये म्हणून शाखाने अधिक मासाची सोय केली आहे.यावर्षीचा अधिकमास चालू झालेला असून तो १६ ऑक्टोबरपर्यंत चाल राहणार आहे. या मासात पुण्यकमें आणि दान केल्यास शतपटीने पुण्य मिळते, असे म्हणतात. दान देताना म्हणावयाचा मत्रा असा
विष्णूरूपी सहस्त्राशुः सर्वपापप्रणाशनम्। अपूपानप्रदानेन मम पापं व्यपोहतु॥ यस्व हस्ते गदा चक्र गरूडो यस्य वाहनम्। शङ्ख करतले यस्य स मे विष्णू: प्रसीदत्॥
हे जगदिश्वर आपण सर्वांचे पाप हरण करणारे आहात, अपूप दानाने माझे सकल पाप नष्ट होवो, अशी प्रार्थना करतो. तसेच ज्याच्या हातात शख, चक्र, गदा आहे व गरुड ज्याचे वाहन आहे, ते भगवान महाविष्णू माझ्यावर प्रसन्न असो. पुरुषोत्तम मासात भगवान श्रीकृष्णाची आराधना केल्याने भरपूर पुण्य पदरी पडून जीवाला उत्तम गती मिळते. राधाकृष्णाची षोडपोचार पूजा करण्याचे पण व्रत सांगितले आहे. दान धर्माकरिता हा मास उत्तम होय. अधिकस्व अधिक फलम् या उक्तीप्रमाणे या मासात केलेल्या पुण्यकदि भरपूर फळ मिळते. ३३ संख्येचे विशेष महत्व असल्याने ३३ अनारसे. दिवे. बत्तासे, खारका, बदाम, पुरणाचे धोडे,इत्यादी ब्राह्मणाला देतात. आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत. ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकार आहे. ते संख्यात्मक नाही. १२ आदित्य. ११रुद्र, ८ वसु आणि २ अश्विनीकुमार, असे ३३ प्रकार होतात.
ईश्वराला उद्देशून व्रत, उपवास, पूजा, होमहवन, दानधर्म इत्यादीशम मानले आहे. भगवताचा पूर्ण अवतार म्हणजे चराचरात त्याचीच सत्ता आहे. त्याच्याशिवाय सृष्टीतील कोणतेच कार्य संभव नाही. आपल्या देहात पण तोच आहे. त्याच्यामुळेच देहाचे सगळे यापार चालतात. त्याच्या अभावाने हा देहचैतन्यशन्य म्हणजे मतदेह होय. त्याच्यामुळेच हा देह चैतन्ययुक्त आहे. भगवताचा अत्यंत प्रिय मास म्हणजे अधिकमास होय. या पुरुषोत्तम मासाचा अधिष्ठाता म्हणजे भगवान विष्णू होय. भगवताचे नामस्मरण तर केव्हाही पुण्यकारक आहे. मग या अधिक मासात केलेले भगवान विष्णूच्या सहस्रनास्मरणामुळे किती पुण्य पदरी पडेल? विष्णुसहस्रनामाचे महत्त्व विशेष म्हणून या पुरुषोत्तम मासात सांगितले आहे. भीष्म पितामाह युधिष्ठिराना सांगतात, भगवान विष्णू पुरुषातील सर्वोत्तम असे जगतप्रभू आहेत. त्याच्या नामस्मरणाने जीवाचे कल्याणच होते, सर्व पापाच्या रशी नष्ट होतात.
सर्वांत उत्तम महिना म्हणून अधिक महिन्याची गणना होते. या महिन्यात शुभ कार्ये होत नाहीत, तरीही धार्मिक कर्मकांडांसाठी मात्र हा महिना उत्तम मानला जातो.
या महिन्यात दानाचे विशेष महत्त्व आहे. तिथीनुसार दान केल्यास बरेच पुण्य पदरात पडते.
- प्रतिपदा- चांदीच्या पात्रात तूप
- द्वितीया- कांस्य पात्रात सोने
- तृतीया- चणे किंवा चण्याची डाळ
- चतुर्थी- खारीक
- पंचमी- गूळ व तुरीची डाळ
- षष्ठी- लाल चंदन
- सप्तमी- गोड रंग
- अष्टमी- कापूर, केवड्याची उदबत्ती
- नवमी- केसर
- दशमी- कस्तुरी
- एकादशी- गोरोचन (गयीच्या पित्ताशयात आढळणारे स्टोन)
- द्वादशी- शंखत्रयो
- दशी- घंटीचे दान
- चतुर्दशी- मोती किंवा मोत्याची माळ
- पौर्णिमा- हिरा, पन्ना
- प्रतिपदा- मालपुआ
- द्वितीया- खीर
- तृतीया- दही
- चतुर्थी- सुती वस्त्र
- पंचमी- रेशमी वस्त्र
- षष्ठी- ऊनी वस्त्र
- अष्टमी- तिळ गूळ
- नवमी- तांदूळ
- एकादशी- दूध
- द्वादशी- कच्ची खिचडी
- त्रयोदशी- साखर व मध
- चतुर्दशी- तांब्याचे भांडे
- पौर्णिमा- चांदीचे नन्दीगण
0 Comments