सर्वांसाठी मानसिक आरोग्य
२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी कोरोना विषाणूचे संकट घेऊन आले. त्यानंतर अचानक कोसळलेला लॉकडाऊन, परिणामी लोकांच्या नोकरी-व्यवसाय-उद्योगावर झालेले दुष्परिणाम, आर्थिक असहाय्यतेतून झालेले स्थलांतर असे समाजाला हतबल करून सोडणाऱ्या संकटांची एक मालिकाच सुरू झाली. यातील प्रत्येक गोष्ट दैनंदिन जीवनात प्रचंड उलथापालथ घडवणारी होती; लोकांच्या मनोस्वास्थ्यावर आघातावर आघात करणारी होती आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आणणारी होती.
१० ऑक्टोबर -- जागतिक मानसिक आरोग्य दिवस -- आपल्या वैयक्तिक, सार्वजनिक, सामाजिक अशा सर्व स्तरावरच्या मानसिक आरोग्य प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी अत्यंत योग्य दिवस!
जनार्थ आदिवासी विकास संस्था मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर गेली अकरा वर्षे काम करत आहे. गाव पातळीवर काम करताना आलेला अनुभव समोर अनेक प्रश्न उभे करणारा होता. सर्वप्रथम म्हणजे मनाचेही आजार असतात हे लोकांना माहीत नव्हते. मनाचा आजार हा कोणी भूतबाधा केली, जादूटोणा केला या स्तरावर ओळखला जात होता. तशी लक्षणे दिसल्यावर आजारी व्यक्तीला भगताकडे नेऊन त्यावर उपाय शोधला जातो. त्यातून आजार कमी होत नसेच. मग आजारी व्यक्तीसोबत काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती पूर्ण गुंतून जाते. दुसरीकडे समाजामध्ये शारीरिक आजार असलेल्या व्यक्तींना जशी सहानुभूती मिळते तशी सहानुभूती मनोरुग्णांना तर मिळत नाहीच, उलट तुच्छता, टिंगल, अवहेलना आणि दुर्लक्षच वाट्याला येते. याबाबत समाजाचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होण्याची गरज जाणवली. सुरुवातीला गावबैठकीतून मानसिक आजार म्हणजे काय, त्याची लक्षणे, औषधोपचार इत्यादीबाबत लोकांशी चर्चा करून अशा मनोरुग्णांचा शोध घेतला. नंतर त्यांच्या कु टंबियांसोबत चर्चा करून मानसोपचार तद्न्यांना दाखवण्यासाठी राजी करून औषधोपचार सुरू करण्यात आले.
सुरुवातीच्या काळात, २००९ मध्ये, असे दिसून आले की संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये खाजगी किंवा सरकारी, एकही मानसोपचार तद्न्य नव्हता. प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्र पासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत शारीरिक औषधोपचाराची यंत्रणा उभी करणाऱ्या शासनाने मानसिक औषधोपचाराची केलेली हेळसांड अत्यंत दुःखदायक होती. आठवड्या-पंधरवड्यासाठी सूरत किंवा धुळे येथून एक दिवसाच्या ओ.पी.डी. साठी शहादा / नंदुरबार मधल्या खाजगी हॉस्पिटलशी जोडून घेऊन मानसोपचार तदन्य येत असत. डॉक्टरांची फी आणि महागडी औषधे गरीब लोकांना न परवडणारी. त्यामुळे एक व्यक्ती मानसिक आजारी म्हणून आणि दुसरी तिची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून अशा दोन व्यक्ती उपजिविकेसाठी काही कमावण्याच्या परिस्थितीत नसल्याने कुटुंबाच्या गरीबीमध्ये अधिकच भर पडायची. बेसिक नीड्स इंडिया, बेंगळुरू यांच्या सहाय्याने संपर्कात आलेल्या रुग्णांना संस्थेने एका खाजगी डॉक्टरांचे औषधोपचार सुरू केले.
शासकिय पातळीवर औषधोपचार उपलब्ध व्हावे म्हणून धुळे जिल्हा रुग्णालयाशी संपर्क व पाठपुरावा करून तेथील मानसोपचार तद्न्य यांनी महिन्यातून किमान एक दिवस नंदुरबार जिल्हा रुग्णालयासाठी द्यावा यासाठी प्रयत्न केले. त्याप्रमाणे तेथील मानसोपचार तद्न्य डॉ. जीवन पवार यांनी काही महिने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ओ.पी.डी. साठी एक दिवस देऊ केला.
याच काळात संस्थेने राज्य पातळीवरही हा प्रश्न नेण्याचा प्रयत्न केला. जनार्थ आदिवासी विकास संस्था २००७-०८ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य पातळीवर राबवल्या जाणाऱ्या 'लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेत सहभागी आहे. साथी, पुणे या राज्य समन्वयक संस्थेसोबत या प्रक्रियेद्वारे सर्वसामान्य लोकांसाठी एक मजबूत शासकिय आरोग्य यंत्रणा उभी रहायला हवी याबद्दल गावापासून ते जिल्ह्यापर्यंतचे मुद्दे मांडत असताना मानसिक औषधोपचाराकडेही आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे आणि किमान जिल्हा पातळीवर तरी एक मानसोपचार तद्न्य नंदुरबार जिल्ह्यात नेमावा अशी मागणी संस्थेने केली. शासनाचे आभार की मागणी लगेच मान्य करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात एक मानसोपचार तद्न्य शासनाने उपलब्ध केला.
संस्थेने मानसिक आजारी व्यक्तींना माणूस म्हणून आपल्याला सर्वांच्या बरोबरीने जगण्याचा हक्क आहे अशी जाणीव व्हावी यासाठी प्रयत्न केले. गावांमधून मानसिक आजारी व्यक्ती, काळजीवाहक व्यक्ती आणि इतर मदत करणाऱ्या लोकांच्या सहभागाने मनस्वास्थ्य मंडळाची बांधणी केली. त्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या. मानसिक आजारी व्यक्ती आणि काळजीवाहक व्यक्ती यांच्या सहली आयोजित केल्या.
आज संस्थेच्या प्रयत्नातून शहादा तालुक्यातील १६५ मनोरुग्ण, नंदुरबार तालुक्यातील १७२ मनोरुग्ण आणि धडगाव तालुक्यातील ४० मनोरुग्ण शासकिय रुग्णालयातून औषधोपचार घेत आहेत. यापैकी बरेच आजारातून बाहेर पडून आपल्या
मानसिक आजार होण्याचे एक प्रमुख कारण हे समाजाच्या असंवेदनशीलतेमध्ये आहे. आपले दु:ख समजून घेणारे या जगात कोणीच नाही अशी जेव्हा मनाची खात्री पटते, तेव्हा मन आपले स्वत:चे जग निर्माण करते आणि त्या जगातच वावरायला सुरुवात करते. शरीरातल्या काही रासायनिक स्त्रावांचा समतोल ढळायला सुरुवात होते. औषधे हा समतोल पूर्ववत आणायला मदत करतात. पण यातून आजार बरे होण्यासाठी ५० टक्केच मदत होते. त्यासाठी सुद्धा स्वतंत्रपणे गावापर्यंत पोचणारी मजबूत मानसिक आरोग्य यंत्रणा उभी राहणे गरजेचे आहे. राहिलेले ५० टक्के हे कुटुंबियांनी, गावांनी, आणि व्यापक अर्थाने सर्व समाजाने संवेदनशील होणे, मानसिक आजारी व्यक्तींचा जिव्हाळ्याने स्वीकार करणे, मानसिक आजार होण्याच्या स्थितीपर्यंत कोणी पोचू नये यासाठी जागरुकपणे प्रयत्न करणे, मनातले दुःख बोलून हलके करण्याच्या जागा समाजात उपलब्ध होणे, मानसिक आजाराबद्दलच्या अंधश्रद्धा नष्ट होणे यातून साधले जाणार आहे.
आज कोरोनाबद्दलचे गैरसमज लोकांना संभ्रमात टाकत आहेत. एका बाजूला कोरोनाबद्दल भिती, दहशतीचे वातावरण तर दुसऱ्या बाजूला बेजबाबदार बेफिकिर वृत्ती वाढत आहे. लॉकडाऊन काळात शाळा-कॉलेज बंद झाल्याने निराश झालेली मुलेमुली आत्महत्या करण्याच्या टोकावर पोचत आहेत. कामे बंद झाल्याने, बेरोजगारीने मानसि
न मानसिक तणाव वाढत आहेत. हाथरसच्या घटनेने स्त्रियांच्या दु:खाला समाज किती बेदखल करतो आहे हे दारुण सत्य समोर आणले आहे! आणि हे सर्व बाजूला ठेवून आख्खा देश धार्मिक-जातीय द्वेषाने फणफणला आहे!! वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी यापेक्षा कुठली योग्य वेळ असू शकते?
रंजना कान्हेरे जनार्थ आदिवासी विकास संस्था, शहादा.
0 Comments