“के. आर. पब्लिक स्कूलच्या विदयार्थ्यांची NEET व JEE परीक्षेत गगनभरारी.......

                

        “के. आर. पब्लिक स्कूलच्या विदयार्थ्यांची NEET व JEE परीक्षेत गगनभरारी.



” श्री. स्वामी समर्थ विदयानिकेतन संचालित के. आर. पब्लिक स्कूल व सिनियर सेकेंडरी नंदूरबार च्या विदयार्थ्यांनी Oct.२०२० मध्ये घेण्यात आलेल्या JEE व NEET परिक्षेत घवघवित यश संपादन केले यात भौमिक क्रिशन दुवा या विदयार्थ्यांने ६२२/७२० ऐवढे गुण प्राप्त करुन तो विशेष प्रविण्यासह NEET परिक्षेत पात्र ठरला आहे. तसेच दिशांत पाटिल, ऋषिकेश वाणी, भाविका जैन, प्रगती पटिल, शुभंगिणी मेहतो, विनया सुर्यवंशी, साक्षी चौधरी कित्येक विदयार्थी NEET मध्ये पात्र ठरले आहेत. तसेच चेतन पाडवी, निरज कुमार गावित, दिक्षांत बोरसे, दिपेश मराठे हे विदयार्थी JEE परीक्षेत पात्र ठरले आहेत. एकुण २७ विदयार्थ्यां पैकी ८ विदयार्थी हे NEET परीक्षेमध्ये पात्र ठरले असुन ४ विदयार्थी हे JEE परीक्षेत पात्र ठरलेले आहेत. या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक शाळेचे चेअरमन श्री. किशोरभाई वाणी, व्हा.चेअरमन श्री. सिध्दार्थभाई वाणी, प्राचार्य श्रीमती. छाया शर्मा, उपप्राचार्य श्री. नदीम शेख व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या सर्व यशस्वी विदयार्थ्यांना शाळेच्या शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले होते. तसेच या सर्वांना चेअरमन सरांनी मार्गदर्शन करीत पुढील परिक्षेसाठी शुभेच्छा दिले.

Post a Comment

0 Comments