उमर्दे ग्रामपंचायततर्फे एक घर एक झाड या उपक्रमाचे उद्घाटन : गावकर्‍यांनी झाडे जगवल्यास घरपट्टीत सुट,स्पर्धेप्रमाणेच नियम व अटी, बक्षीसांचेही होणार वाटप

उमर्दे ग्रामपंचायततर्फे  एक घर एक झाड या उपक्रमाचे उद्घाटन : गावकर्‍यांनी झाडे जगवल्यास घरपट्टीत सुट,स्पर्धेप्रमाणेच नियम व अटी, बक्षीसांचेही होणार वाटप

मर्दे खुर्दे येथे ग्रामपंचायतीतर्फे  हरियाली उपक्रमाअंतर्गत एक घर एक झाड उपक्रमाचे उद्धाटन करताना सामाजिक कार्यकर्ते अमोल भारतीसॊबत प.स.विस्तार अधिकारी वाय.डी.पवार,सर्कल श्रीमती ब्राम्हणे,सरपंच अरविंद ठाकरे,उपसरपंच सागर साळुखें,कृषी सहाय्यक अक्षय वसावे,तलाठी श्री.सुर्यवंशी, ग्रामसेवक भरत घुले,ग्रा.सदस्य पंकज साळुखें,श्रावण पाटील,खंडु कदमबांडे,रमेश कुटे,शांताराम कदमबांडे व ग्रामस्थ .... 

              नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे ग्रामपंचायतीतर्फे एक घर एक झाड हा अभिनव उपक्रम बविला जात आहे.त्याचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.  हा उपक्रम तीन वर्षांसाठी असणार आहे. यात जे कुटुंब स्पर्धेत भाग घेवुन झाड जगवले तर त्यांना घरपट्टीत सुट मिळणार आहेत. स्पर्धेप्रमाणेच येथे नियम व अटी राहणार असुन  बक्षीसांचेही जाहीर करण्यात आले आहेत.

           नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे ग्रामपंचायतीतर्फे  हरियाली उपक्रमाअंतर्गत एक घर एक झाड उपक्रमाचे उद्धाटन सामाजिक कार्यकर्ते अमोल भारती यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले .यावेळी प.स.विस्तार अधिकारी वाय.डी.पवार,सर्कल श्रीमती ब्राम्हणे,सरपंच अरविंद ठाकरे,उपसरपंच सागर साळुखें,कृषी सहाय्यक अक्षय वसावे,तलाठी श्री.सुर्यवंशी, ग्रामसेवक भरत घुले,ग्रा.सदस्य पंकज साळुखें,श्रावण पाटील,खंडु कदमबांडे,रमेश कुटे,शांताराम कदमबांडे व ग्रामस्थ उपस्थीत होते.यावेळी प्रस्तावना अरविंद ठाकरे यांनी केली. 

स्पर्धेचा कालावधी 

उमर्दे ग्रामपंचायतीमार्फत हा उपक्रम पुढच्या तीन वर्षांसाठी असणार आहे. या उपक्रमात स्पर्धेप्रमाणचे नियम व अटी राहणार असुन गावातील प्रत्येक घराला सहभागी होता येणार आहे.

घरपट्टीत सवलत  

जे कुटुंब स्पर्धेत भाग घेतील व झाडे जगवली त्यांना घरपट्टी पहिल्या वर्षी १० टक्के, दुसर्‍या वर्षी २० टक्के, तिसर्‍या वर्षी ३० टक्के सुट देण्यात येणार आहे. ग्रामस्थांना रोपे ग्रामपंचायत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  स्पर्धेचा निकाल तिसर्‍या वर्षी जाहीर होणार आहे.

स्पर्धेचे नियम व  बक्षीस स्वरूप 

 वृक्षांची  स्थिती पाहून पंचवीस कुटुंबांची निवड करण्यात येणार आहे.व त्यात 

  • प्रथम १० हजार
  • व्दितीय ७ हजार
  • तिसरा ५ हजार
  • चौथा ३ हजार
  • पाचवा २ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.
व पुढच्या १० कुटुंबांना प्रत्येकी १ हजार रुपये बक्षीस वितरण करण्यात येईल. व पुढील एक वर्षांची घरपट्टी ही सूट देण्यात येईल.  शेवटचे १० कुटुंबं असतील त्यांना  पुढील एक  वर्षांची घरपट्टी  सूट देण्यात येणार आहे.या स्पर्धेत एका कुटुंबाला एकच झाड लागवड करता येईल परंतु जर त्या कुटुंबांचे दोन घरं असतील किंवा दुमजली असेल तर दोन झाडं लावू शकणार आहेत.दर सहा महिन्याला प्रत्येक झाडाचे फोटो ग्रामपंचायत मार्फत काढण्यात येणार आहेत.एखाद्या कुटुंबाचे झाड मेले  तर त्या जागेवर त्या कुटुंबाने स्वखर्चाने झाड जगवु शकतात  परंतु ते ग्रामपंचायतला कळवणे आवश्यक आहे.अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.

उपक्रमा मागील धारणा  

 गावाचे आरोग्य निरोगी ठेवणे,गावातील सौंदर्य फुलविणे  पाणीटंचाई, दुष्काळापासुन मुक्तता व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.गावकर्‍यांनी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच अरविंद ठाकरे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व अभार श्रावण चव्हाण यांनी मानले.

Post a Comment

0 Comments