रिपब्लिक भारत राष्ट्रीय न्युज चॅनलचे मुख्य संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ नंदूरबार जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे भाजपा जिल्हा कार्यलयात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला...
यांबाबत आपले विचार व्यक्त करताना नंदूरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले की सध्या राज्यात महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुड बुध्दीचा कारभार करत आहेत.प्रसिध्द पत्रकार अर्नब गोस्वामी यांना झालेली अटक लोकशाहीला काळीमा फासणारी आहे.ही घटना आजच्या ईतिहासात काळा दिवस नोंद म्हणुन नोंद केली जाईल.पत्रकार हे नेहमी समाजासमोर सत्य मांडत असतात.परंतु राजकीय पोळी भाजण्यासाठी व आपले पितळ उघडे पडु नये म्हणुन सुडबुध्दीचे राजकारण करीत आहेत.अर्नब गोस्वामी यांच्या अटकेतुन महाविकास आघाडी देशात व राज्यात आणीबाणी लादु ईच्छित आहे असे वाटत आहे.
पत्रकारीता हा देशाचा चौथा स्तंभ आहे.पत्रकार हा समाजाला नेहमी समाजाला दिशा दाखविण्याचे काम करीत असतो.पत्रकार अर्नब गोस्वामी यांनी देखील समाजासमोर सत्यच मांडले आहे.एकुणच राज्यात महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुडबुध्दीचे राजकारण करीत आहेत यावरुन ते सिध्द होत आहे.पत्रकार अर्नब गोस्वामी यांचा अटकेचा जाहीर निषेध करीत असल्याचे यावेळी सांगितले यासंदर्भात रिपब्लिक भारत राष्ट्रीय न्युज चॅनलचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांना जाहीर निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले आहे
निवेदनावर भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, खासदार हिनाताई गावित, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, मा.जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जमदाडे, सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष नितेश राजपूत, भटके विमुक्त जाती आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, प्रा पंकज पाठक युवा मोर्चा जिल्हा प्रभारी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निलेश चौधरी , महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अश्विन सोणार, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश चौधरी आदी उपस्थित होते.




0 Comments