देवरे विद्यालयातर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप.

 देवरे विद्यालयातर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप.         



    
 विखरण : -श्री. आप्पासो.आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.जि.नंदुरबार विद्यालयातील विषय शिक्षकांनी स्वाध्याय पुस्तिका तयार केल्यात. विद्यालयाचा " शिक्षक आपल्या दारी ज्ञानगंगा घरोघरी " या उपक्रमांतर्गत  विद्यालयाकडून इयत्ता पाचवी ते दहावीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या वाड्या, वस्तीत जाऊन मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.



या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विखरण गावाचे मा.सरपंच श्री.राजू पवार,विखरण गावाचे पोलीस पाटील सौ. दीपमालाताई पाटील व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.डी.साळुंके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पुस्तिकांचे वाटप करण्यात आले

हा कार्यक्रम विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱी यांनी परिश्रम घेऊन यशस्वी केला.

Post a Comment

0 Comments