खोडाईमाता यात्रा यंदा दांडियासह विविध धार्मिक कार्यक्रमाला कोरोनामुले पडेल खंड ....

            खोडाईमाता यात्रा यंदा दांडियासह विविध धार्मिक कार्यक्रमाला कोरोनामुले पडेल खंड

नवसाला पासूनही आदिशक्ती आई खोदाईमाता 

नंदुरबार : नवरात्रोत्सवात राहणारी गरबा, दांडियाची धूम यंदा राहणार नाही, देवीचा जागरलाही मर्यादा राहणार आहेत. नंदुरबारची प्रसिद्ध खोडाई देवीची यात्राही भरणार नाही.  कोरोनामुळे  मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव यात्रा, जागरण, दुर्गा दौड, दांडिया विरहित असल्याचे प्रशासन कडून कळविण्यात आले आहे

प्रवेश द्वारवर लिखाण करताना 


जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड  याचे आव्हान...

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा हे उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

रंगरंटोती करताना... 

परवानगी व पर्यावरण पूरक असणे...

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी नगरपालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबत धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.


दिवे व स्थापनेसाठी लागणारे घट तयार कारणातून कुंभार 

कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरू होण्याआधी नवीन काही सुचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यावर्षीचा नवरात्रोत्सव शांततेत व सस्थितीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

देवीला सजविण्यासाठी लागणारे चुनरी 

काय काय मुकणार...

  • नंदुरबारातील खोडाईमाता मंदिर परिसरात भरणारा यात्रोत्सव नवरात्रोत्सवात आकर्षण असतो.

  • शहरवासी आणि तालुकावासीयांच्या दृष्टीने एक आनंद पर्वणी असते नऊ दिवस भरणारी ही यात्रा. लाखो रुपयांची उलाढाल देखील होत असते.

  • नऊ दिवस यात्रेच्या माध्यमातून अनेक लहान, मोठ्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत असतो.

  • फुलहार पूजेचे साहित्य विक्री व्यवसायावर विरजण


मातेची मूर्ती सजावट करताना 

नवरात्र उत्सव निमित्त अखंड ज्योत साठी लागणारे दिवे मोठी मागणी असते तसेच स्थापने साठी लागणारे माती चे
घट बनविण्याचा कामाला वेग आला असून कुंभार जोमाने कमला लागला आहे त्याच बरोबर खंडाईमाता मंदिराला
रंगरंगोटी व फलकाला डागडुगी करण्याचे काम सुरु आहे. दांडिया नसल्याने युवक युवतीचा उत्साह मंदावलेला
दिसत आहे टिपऱ्या विक्री करणारे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ अली आहे.

कपडे व्यावसायिकाचे नुकसान

वेगवेगळ्या प्रकारचे पोषक 


नऊ दिवस नवरात्र उत्सवात वेगवेगळ्या परिधान करून तरुण तरुणी दांडियाचा तालावर मंत्रमुग्ध होऊन ठेका
धरतात नंदुरबार हे गुजरात राज्याला लागून असल्याने व बऱ्याच प्रमाणात गुजराथी समाज असल्याने त्यांना
वेगवेगळ्या पोषक परिधान करून दांडिया खेळण्याचा मोह आवरला जात नाही

हॉटेलसह लहान व्यावसायिकाचे नुकसान
भेळ पाणीपुरी वाला 

खोदाईमाता मंदिर परिसरात नऊ दिवस यात्रेचे स्वरूप असते त्यावेळीस यात्रेस येणाऱ्या भाविकांना आपल्या चटपटीत
खाणायची मोह सुद्धा आवरला जात नसल्याने लॉरीवाल्याकडून पाणीपुरी, भेळ असे अनेक पदार्थ विक्री करणारे
त्याचे नुकसान होईलच

अश्या अनेक लोकांचा व्यवसायावर विरजण येणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे प्रशासन आणि पोलिसांचे
र्व बाबींवर लक्ष राहणार आहे. भाविकांनी देखील या संकट काळात मदत व सहकार्य करणे आवश्यक आहे.
तोंडावर नेहमी मास्क घालणे अनिवार्य असल्याने यंदा कदाचित एखादा भाविक विनामसक आढळल्यास न्यायालयाने
सुचविलेले दंड संबंधित अधिकारी करतीलच यांत काही शंका नाही प्रत्येक व्यक्ती मध्ये एक मीटर अंतर असणे
गरजेचे आहे कॉरोनची लास अजून उपलब्ध नसल्याने नियमांचे पालन हीच आपली लस आहे म्हणून प्रत्येकाने
आपापली काळजी घेणे गरजेचे आहे

Post a Comment

0 Comments