जिल्हा परिषद प्राथ. शाळा, नवापाडा(विसरवाडी ) येथे जागतिक हात धुवा दिवस व वाचन प्रेरणा दिवस साजरा....

जिल्हा परिषद प्राथ. शाळा, नवापाडा(विसरवाडी ) येथे जागतिक हात धुवा दिवस व वाचन प्रेरणा दिवस साजरा.... 

दि.15/10/2020 रोजी जिल्हा परिषद प्राथ. शाळा, नवापाडा(विसरवाडी ) येथे जागतिक हात धुवा दिवस व वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्सवाने राबविण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए .पी.जे. कलाम याच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आले 



सर्व उपस्थित मुले व पालक यांना हात धुण्याचे महत्व पटवून देत प्रात्यक्षिक करून दाखविले आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्वांना 1 तास वाचन हा अभिनव उपक्रम आजच्या दिवसानिमित्त राबविला.



संपूर्ण कार्यक्रमात कोरोना रोग प्रतिबंधक नियमाचे पालन करण्यात आले.सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री.अनिल कोकणी सहशिक्षक श्री.कमलेश पाटील व अनिता बागुल मॅडम उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments