भारतीय जनता पार्टीतर्फे अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची प्रवेश प्रक्रिया राबविणे बाबत निवेदन...
भारतीय जनता पार्टीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची विद्यालयीन/महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरु असुन सदर विद्यार्थ्यांनी आपले तात्पुरता प्रवेश ( Provisional Admission) घेतलेले असुन अद्याप अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांची वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरवर्षाप्रमाणे आपल्या स्तरावरुन विद्यार्थी वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया Online पार पाडली जाते. परंतु शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अद्यापपर्यंत Online प्रवेश प्रक्रिया Sitc सुरु नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यालय/महाविद्यालयात व वस्तीगृहात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कोविड-१९ महामारीच्या काळात आरोग्याच्या समस्यांबरोबरच आर्थिक भुर्दंडालाही सामोरे जावे लागत आहे.
सदर परिस्थितीत विद्यार्थ्यांनी ज्या विद्यालय/महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश (Provisional Admission) घेतलेला आहे त्या ठिकाणी वस्तीगृह प्रवेश झाला नाही तर त्यांचे शेक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच सदर विद्यार्थ्यांचे वस्तीगृह प्रवेश झाला नाही तर त्यांना दुसऱ्या विद्यालयात/महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेस विलंब झाल्यामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास सामोरे जावे लागेल. तसेच इ. ११ वी च्या विद्यार्थ्यांचे Renewal Form भरण्याची ही प्रक्रिया सुरु नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करुन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वस्तीगृहाची Online प्रवेश प्रक्रिया सोबत इ. ११ वी च्या विद्यार्थ्यांचे Renewal Form भरण्याची ही प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी; ही विनंती.
निवेदन देण्यासाठी उपस्थितांची नावे -
आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपथित
0 Comments