शिक्षण आपल्या दारी स्तुत्य उपक्रम; डॉ सुहास जयंत नटावदकर

शिक्षण आपल्या दारी स्तुत्य उपक्रम; डॉ सुहास नटावदकर 

प.खा.भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित, वनवासी विद्यालय व एस.सी.चव्हाण  कनिष्ठ  हाविद्यालयाचा ज्ञानगंगा आपल्या दारी असा अभिनव उपक्रम


शिक्षण आपल्या दारी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिक्षक डी. एल. कुलकर्णी 

चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी.चव्हाण  कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बी एम निकुंभ  यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण आपल्या दारी असा उपक्रम राबविण्यात आला. १५ जून पासून शाळा सुरू आहेत परंतु शासननिर्णयानुसार कोरोनामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊ शकत नाही. परंतु चिंचपाडा येथील वनवासी विद्यालयाने शाळा सुरू झाल्या पासून विविध ऑनलाईन कार्यक्रम सुरु कारले आहेत 
वाचन प्रेरना दिनानिम्मत  सामूहिक वाचन करताना विध्यार्थी 


कोण कोणते कार्यक्रम राबविण्यात आलेत…. 
  1. ऑनलाईन शिक्षण
  2. पर्यावरण पूरक गणपती उत्सव
  3.  रक्षाबंधन 
  4. शिक्षक दिन
  5.  हिंदी दिन 
  6. गांधी जयंती 
  7. वाचन प्रेरणा दिन
  8. जागतिक हात धुणे दिन
  9. शिक्षण आपल्या दारी 

वाचन प्रेरना दिनानिम्मत  सामूहिक वाचन करताना विध्यार्थी व शिक्षक 

असे विविध उपक्रम शाळेने राबविले. शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आज परिसरातील 
वऱ्हाडीपाडा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यालयातील शिक्षक डी एल कुलकर्णी , व्ही बी बागुल , वाय के पाटील, व्ही एस न्हायडे व प्राध्यापक व्ही एस सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात जाऊन अध्यापन व मार्गदर्शन केले. 

जागतिक हाथ धुणे  दिनानिमित्त हाथ धुताना विध्यार्थी व शिक्षक 

यावेळी गावातील बरेच पालक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.तसेच जागतिक हात धुणे दिनानिमित्त प्रत्यक्ष हात धुण्याचे प्रात्यक्षिक व आरोग्यचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. चिंचपाडा परिसरातील विविध गावांमध्ये प्राचार्य श्री.बी.एम.निकुंभ, पर्यवेक्षिका श्रीमती एन.एम.गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांचे गट प्रत्येक गावात  शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवित आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील वनवासी शाळेने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास जयंत नटावदकर यांनी व परिसरातील सर्व पालकांनी शिक्षक बंधू- भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments