भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार

 भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार

नंदुरबार : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे नवदुर्गा शक्ती सन्मान पुरस्काराचे वितरण

     दिनांक 24 ऑक्टोबर 2020 रोजी महिला मोर्चा आयोजित नवदुर्गा शक्ती सन्मान पुरस्कार भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी व खासदार हिना ताई गावित यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ओम शांती परिवाराच्या विजया दीदी तसेच सामाजिक कार्यकर्त्या पिनल शहा, डॉक्टर तेजल चौधरींसह नऊ महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पायल मोदानी, ऍड उमा चौधरी, सविता जयस्वाल युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अनुसूचित जाति मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर आदी उपस्थित होते.

नंदुरबार : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे नवदुर्गा शक्ती सन्मान पुरस्काराचे वितरण

Post a Comment

0 Comments