मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध: डॉ. रविंद्र चौधरी
नंदुरबार (प्रतिनिधी) पालिका सभेचे खोटे चित्रिकरण दाखवून घरपट्टी माफीचे श्रेय भारतीय जनता पार्टीला जाणार असल्यामुळे सत्ताधारी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी घुमजाव करून नंदनगरीच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी शहरातील जनतेत धुळफेक करून राजकारण करणार्या प्रवृत्तीचा आणि मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध करीत असल्याचे भाजपा नेते डॉ. रविंद्र चौधरी यांनी सांगितले. दरम्यान पालिका हिताच्या विरूध्द जाणार्या भाजपा नगरसेवकांचे पद अपात्र करण्याचा मनसुबा आखणार्या नगराध्यक्षांनाच घरी बसावे लागेल असे प्रत्युत्तर चौधरी यांनी दिले.
सध्या नंदुरबार नगरपालिकेच्या मालमत्ता कर आणि घरपट्टी वादाने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेय वादावरून जुंपली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आज भाजपा नेते डॉ.रविंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते पुढे बोलतांना म्हणाले की, नंदुरबारच्या सामान्य जनतेच्या हितासाठी घरपट्टीत सवलत देण्याबाबत भाजपा आग्रही होती. त्यानुसार गाळेधारकांना तीन महिन्याचे भाडे माफ केले. याच धरतीवर कोरोनानी लॉकडाऊनमध्ये आर्थिक कंबरडे मोडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सहा महिन्याची घरपट्टी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत भाजपातर्पेâ पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना पत्र देण्यात आले. मात्र चंद्रकांत रघुवंशी कुठल्याही पदावर नसतांना नगरपालिकाबाबत कुठलीही भुमिका मांडण्याचा देखील अधिकार नसल्याचा टोला रविंद्र चौधरी यांनी लगावला. सध्या राजकारणकरीत श्रेयवादाच्या नादात घुमजाव केलेले आहे. घरपट्टी माफीचा अधिकार नसल्याचे चंद्रकांत रघुवंशी म्हणतात तर दुसरीकडे नगरपालिकेतंर्गत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, इंदिरा गांधी मंगल कार्यालय व व्यापारी संकुल, सीबी गार्डन, शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल आदीसह विविध मालमत्ता चालविणार्या संस्थांना घरपट्टी भरणे बंधनकारक आहे. परंतू सरसकट माफ करून नगरपालिकेने एकतर्फी निर्णय घेतला. नंदुरबार शहरातील अनेक अल्पभुधारक आणि झोपडपट्टीमध्ये राहणार नागरीकांना ९ हजारांच्या वर घरपट्टी आकारण्यात आली आहे. जनतेची दिशाभुल करणार्या सत्ताधारीचे दुध का दुध व पाणी का पाणी करण्याची धमक भाजपा नगरसेवकांमध्ये आहे, असेही डॉ. रविंद्र चौधरी म्हणाले.
भारतीय जनता पाटीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले की, गेल्या अनेक वर्ष नंदुरबार नगरपालिकेची सत्त्ता एकछत्री असल्याने भाजपाने ती मोडीत काढली. जनतेच्या पैशांची लूट करणार्या सत्त्ताधारी गटाला भ्रष्टाचारापासून लगाम देण्यासाठी भाजपा आव्रâमक झाली आहे. शहरातील रस्ते व भुमिगत गटारीची दुरावस्था झाली असून कोरोनानंतर नंदुरबारकरांवर दुसरा महामारीचे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपा नगरसेवक चारूदत्त्त कळवणकर यांनी सांगितले की, नंदुरबारच्या जनतेसाठी घरपट्टी विषयावर सत्त्ताधारीनी केलेला प्रकार क्लेषदायक आहे. जनहितासाठी भाजपा वेळोवेळी लढा देत राहणार असल्याचे विरोधी पक्ष नेते चारूदत्त्त कळवणकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस भाजपा नगरसेवक गौरव चौधरी, आकाश चौधरी, प्रशांत चौधरी आनंद माळी, कमल ठाकुर, लक्ष्मण माळी, नगरसेविका संगिता सोनवणे, भाजपा शहराध्यक्ष माळी आदी उपस्थित होते.



0 Comments