वनवासी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा*

                वनवासी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा   



      पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित वनवासी विद्यालय व एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा येथे प्राचार्य भरत निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी चाचणी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षकांनी व्हॉट्सऍप गृप तयार केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना रोज विषय शिक्षक ऑनलाईन मार्गदर्शन करतात व ऑनलाईन चाचणी सुध्दा दिली जाते. परंतु सर्वात अभिनव म्हणजे प्राचार्य व पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालययात येणाऱ्या चिंचपाडा गावातील, वराडीपाडा, गंगापूर, तीनमौली ,बंधारे, केलपाडा, सोनारे, बिलगव्हान गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक बंधु-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी स्वतः त्यांचा गावात जाऊन चाचणी परीक्षेचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी प्रत्येक विषय शिक्षकांनी स्वतः प्रश्नपत्रिका तयार करून विद्यालयातील परीक्षा समिती प्रतिनिधी धनंजय कुलकर्णी यांच्याकडे  सुपूर्द केल्यात व कुलकर्णी यांनी शाळेच्या पटसंख्या इतक्या झेरॉक्स केल्यात. तर वर्गनिहाय व गावनिहाय नियोजन विद्यालयातील शिक्षक राजू गावीत, दिलीप गावीत, अशोक पाडवी, प्रेमल पाडवी, लक्ष्मण गावीत, संदिप वळवी,  विजया न्हायदे ,  सुभाष  वळवी व संतोष धोडीया यांनी केले. तर कनिष्ठ महाविद्यालयाचे नियोजन प्रा. रामकृष्ण सोनवणे, प्रा. दिलीप गावीत व प्रा. विकास सपकाळे यांनी केले. आदिवासी व ग्रामीण भागातील या शाळेने विद्यार्थी जरी शाळेत येत नसले तरी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गावात जाऊन हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या विद्यार्थी मूल्यमापनाच्या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास नटावदकर व पालकांनी कौतुक केले आहे.  


Post a Comment

0 Comments