महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करणार -डॉ हीनाताई गावित

 महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करणार -डॉ हीनाताई गावित



                           आत्मनिर्भर महिला उधोजीका गट,नंदुरबार जिल्हा विकास समिती व श्रीकृष्ण पापड उधोग याच्या संयुक्त विध्यमाने व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनात महिला उधोजीकाच्या उत्पादनाच्या वस्तूचे बहुद्देशीय विक्री केंद्र,प्रदर्शनी व श्रीकृष्ण पापड गृह उधोगाचा शुभारंभ प्रसंगी मा डॉ हिनाताई गावित मार्गदर्शन करताना महिलाच्या कल्पक विचारांना चालना देण्यासाठी शासनाच्या योजनासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी डॉ.विजयकुमारजी गावित,सौ कुमुदिनी गावित,श्रीमती डॉ सुप्रिया गावित,श्री प्रदीप देसाई सहा.प्रकल्प अधिकारी,श्री गजाननजी डांगे(योजक संस्था),श्री राजेंद्र दहातोंडे (KVK), ,श्री संजय धामणकर(भारतीय स्टेट बँक),सौ अॅड उमाताई चौधरी,सौ डॉ तेजल चौधरी उपस्थित होते.

                       नंदुरबार शहरातील व जिल्हातील व्यवसाय करण्याऱ्या महिला उधोजीकाना दर्जेदार उत्पादन करण्यासाठी मार्गदर्शन व तयार झालेल्या मालाला जिल्ह्यात व जिल्हा बाहेर विक्रीची संधी मिळावी या उद्देशाने महिलांनी एकत्र येऊन आत्मनिर्भर महिला उधोजीका नावाचा गट तयार केला असून या गटातील महिला ग्राहकांना मागणीनुसार उत्पादने तयार करून घरपोच पोहचवून देतात,उत्पादनाच्या जाहिरातीसाठी व वस्तूच्या विक्रीसाठी व्हाटस अॅप ग्रुपद्वारा संपर्क करण्यात येत आहे.आजमितीला या ग्रुपमध्ये ४० उधोजक महिला असून या उधोजीकाच्या माध्यमातून शहरातील५०० कुटुंबांपर्यंत इडली,खमण, चकली,अनारसेचे प्रीमिक्स, केक, नास्ताचे विविध पदार्थ,डेकोरेटिव्ह साहित्य,साड्या,तयार कपडे, लाकडी कलाकुसरीचे साहित्य,सौदर्य प्रसाधने,या सारख्या वस्तूची विक्री या द्वारे करण्यात आलेली असून करण्याचे आतापर्यंत २ लक्ष्य रुपयाची उलाढाल या गटाने केलेली आहे.

सौ कल्पना पाटील यांच्या श्रीकृष्ण पापड उधोगाला जिल्हा उधोग केंद्राच्या मुख्यमंत्री रोजगार योजना व भारतीय स्टेट बँकेद्वारे सहकार्य करण्यात आलेले आहे,अश्याप्रकारे  महिलांना व्यवसायासाठी जिल्हा उधोग केंद्राकडून योजनेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल अशी खात्री श्री दिलीप पाटील व्यवस्थापक यांनी दिली.

अश्या प्रकारचे उपक्रम माविमच्या सहकार्याने सुरु करावे यासाठी तहसील कार्यालयाचे संपूर्ण मदत दिली जाईल असे मत श्री भाऊसाहेब थोरात तहसीलदार नंदुरबार यांनी केले  

नाबार्डच्या सहकाऱ्याने रुरल मार्ट,कौशल्य प्रशिक्षण व अर्थ सहाय्यासाठी मार्गदर्शन व मदत देण्यात येईल याची हमी श्री प्रमोद पाटील जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड यांनी दिले.

महिलाच्या विकासासाठी महिला आर्थिक विकास महामंडळद्वारे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करेल असे श्री संजय संगेकर जिल्हा समन्वय अधिकारी माविम यांनी सांगितले

या कार्यक्रमाचे,संचालन श्री जयंत उत्तरवार यांनी केले,तर आभार सौ प्राप्ती पाटील यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री विजय कासार,अमोल चौधरी,अनिकेत अत्तरदे,रामसिंग वसावे,मानसिंग पाडवी,सौ कल्पना पाटील, सौ शिल्पा कासार,सौ ज्योती बागले,सौ.गिरासे, सौ.आशा सोनावणे व सौ.निशा कासार यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments