उमर्दे शिवारात चर्चा बिबट्यांच्या बछड्यांची निघाले रानमांजराचे पिल्लू...

 उमर्दे शिवारात चर्चा बिबट्यांच्या बछड्यांची निघाले रानमांजराचे पिल्लू....

उमर्दे रस्त्यावरील कापसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आल्याचे मोठ्या प्रमाणावर चर्चीले गेले. सोशल मीडियावर त्याचे फोटो टाकून ते विविध गावाच्या शिवारात आढळल्याचे सांगितले गेले. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उमर्दे रस्त्यावरील शेतात भेट दिली असता बछडे नव्हे तर ते रान मांजराचे पिलू असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण काहीसे निवळले.

उमर्दे रस्त्यावरील शेखर मराठे यांच्या शेतात रविवारी बिबट्याचे दोन बछडे आढळल्याचे बोलले जात होते. काहींनी तेथील शेतमजुराच्या हातात असलेल्या बछड्यांचे छायाचित्र घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्याला विविध गावांची जोड देण्यात आली. जसे पुढे फॉरवर्ड होत गेले तसे गावांची नावेही बदलत गेली. आष्टे, नांदखें, रनाळा, खोक्राळे आदी गाव शिवार त्याला जोडण्यात आले. यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झाले. सद्या शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी, शेतमजूर शेतांमध्ये दिवसभर राबत आहेत. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी देखील शेतकऱ्यांना जावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली.

 रानमांजरचे पिल्लू  निघाले 

वन विभागाने उमः शिवारातील मराठे यांच्या शेतात जाऊन पहाणी केली. तेथील शेतमजुराने पकडलेल्या पिल्लूंची पहाणी केली असता ते रानमांजराची पिल्ले असल्याचे वन विभागाचे अधिकारी मनोज रघुवंशी यांनी सांगितले.

पिल्लू लहान असतांना ते बिबट्याच्या बछड्यांसारखेच दिसते. पहातांना अनेकांची गफलत होऊ शकते. त्यामुळे जाणकार आणि वन विभागाला कळवून माहिती जाणून घेतल्यास अफवा पसरणार नाहीत असेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरात वावद, स्नाळा, वटबारे, ठाणेपाडा जंगलात वाघसदृष्य प्राणी पाहिल्याचा दावा अनेकांनी केला आहे. परंतु वन

नाही. बिबट्याचा संचार या भागात आहे. नर व मादी दोन्ही या भागात काही वेळा आढळून आलेली आहेत. परंतु वाघ असल्याबाबतच्या कुठलीही पदचिन्हे किंवा इतर माहिती उपलब्ध नसल्याचे यापूर्वीच वन विभागानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

रान मांजरीचे पिल्लू सहज ओळखता येतात 

रानमांजर हे सहज ओळखता येते. मुखाचा भाग पाहिल्यास प्रथम ते बिबट्याच दिसते. परंतु पाय लांब, शेपूट आखूड, डोळे फिकट हिरवे, कान तांबूस, रंग भुरकट व राखाडी, शेपटीचे टोक काळे तर पंजे फिक्कट पिवळसर असतात. हा प्राणी भित्रा आहे. परंतु चेहऱ्यावरील कौर्यमुळे भीती निर्माण होते. गवताळ, झुडपे व दलदलीच्या भागात रानमांजर मोठ्या प्रमाणावर आढळून येते.



.उमर्दे रस्त्या लागत शेतात रान मांजराचा पिल्लूचा शोध शेतांना वनविभागाचे पथक 


Post a Comment

0 Comments