नंदुरबार शहरात लवकरच NAPL च्या धर्तीवर अद्ययावत रुग्णालय उभारणार ...मा. आ.चंद्रकांत रघुवंशी याची माहिती ....

 नंदुरबार शहरात लवकरच NAPL च्या धर्तीवर अद्ययावत रुग्णालय उभारणार ...मा. आ.चंद्रकांत रघुवंशी याची माहिती ....




 नंदुरबार शहरातील जनतेला निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करण्याच्या उद्देशाने  लवकरच नगरपालिकेच्या माध्यमातून अथवा रघुवंशी परिवाराच्या वतीने 70 ते 100 बेडचे अद्ययावत रुग्णालय नंदुरबार शहरात सुरू करणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी  दिली . नंदुरबार शहरातील जनतेला निवडणुकीच्या वेळीस  वचन दिले होते की एक अद्ययावत ,सर्व उपकरणांनी सज्ज असे रुग्णालय शहरात उभारले जाईल आणि ते वचन लक्षात घेता लवकरच केंद्रसरकारच्या NAPL च्या धर्तीवर अद्ययावत रुग्णालय, विलासराव देशमुख  ट्रक टर्मिनल समोरील जागेवर  बांधले जाणार आहे .या रुग्णालयात सरकारच्या सर्व योजना व नियम लागू करण्यात येऊन दीड ते दोन लाखापर्यंत मोफत उपचार जनतेला दिला जाईल . यासाठी रघुवंशी मेडिकॉन नावाची कंपनी रजिस्टर केली असून त्या माध्यमातून नगर पालिका अथवा रघुवंशी परिवाराच्या वतीने रुग्णालय बांधून जनतेची सेवा करण्याचे अभिवचन दिले व ते पाळण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले .


Post a Comment

0 Comments