राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी अनिल गांगुर्डे तर सचिव पदी कैलास ढोले कार्याध्यक्षपदी बोरसे...
नंदुरबार- डाँ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी अनिल गांगुर्डे तर सचिवपदी कैलास ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षक परिषदेच्या ध्येयधोरणांना अभिप्रेत संघटनात्मक बांधणी करून शिक्षकांच्या सर्व स्तरातील समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच शिक्षकांना येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यास सदैव कटीबध्द राहू असे जिल्हाध्यक्ष अनिल गांगुर्डे यांनी यावेळी सांगितले. शिक्षक परिषदेची तालुकानिहाय कार्यकारिणी तयार करून शिक्षक हितासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा सचिव कैलास ढोले यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल गांगुर्डे यांनी जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा कार्याध्यक्षपदी महेश बोरसे यांची नियुक्ती व जिल्हाउपाध्यक्ष पदी ब्रिजलाल चव्हाण, जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी नारायण नांद्रे आणि जिल्हा संघटकपदी स्वप्निल पाटील यांची नियुक्ती केली .
राज्याध्यक्ष प्रभाकर झोड,सरचिटणीस व्यंकट जाधव, कार्याध्यक्ष धनंजय उजनकर विभागीय अध्यक्ष प्रेमचंद अहिरराव यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. सदर निवडीबद्दल गांगुर्डे व ढोले, बोरसे आदी पदाधिकारींचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
0 Comments