इतिहास
सध्याच्या टपालव्यवस्थेची सुरवात सतराव्या शतकात इस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. १६८८मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉर्न हेस्टिंग्ज बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना आणि मुंबई आणि मद्रास प्रांताचे देखरेखीचे अधिकार त्यांच्याकडे असताना सन १७७४ मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन टपालासोबत वापरायला सुरूवात झाली. सुरवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सींअंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा, १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा टपाल कायदा अस्तित्वात आला, त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला. २०११ पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन मागे पडून, १ ऑक्टोबर १८५४ पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकीटे अस्तित्वात आली
संदेसे आयते है हमी ताडपते है ओ चिठ्ठी आता है हमी ताडपती है..... , किया डाक लाया, डाकिया डाक लाया... आपण नक्कीच कुठे ना कुठे ऐकले असेल. पण पत्ररुपाने समाचार घेऊन येणारा पोस्टमनच इथे हरवून जातो की, काय ? अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. आज ९ ऑक्टोबर २०२०, जागतिक टपाल दिवस! यानिमित्ताने उजाळा
टपाल आणि बदलत्या संवादाचे स्वरूप ...
बदलत्या संवादाच्या साधनांबाबत आणि एकूण परिस्थितीवर सर्वांना चिंतन करायला लावणारा हा लेख...
एक काळ असा होता जेव्हा लोक दिवसापत्रांची वाट बसायचे. मात्र बदलत्या काळाबरोबरच आणि तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल, सोशल मीडियामुळे क्षणात कोणाशीही संवाद साधता येतो.आज जागतिक टपाल दिवस. ९ ऑक्टोबर १९६९ पासून टपाल दिवस साजरा केला जात आहे. मात्र, आजच्या यंग जनरेशनला पत्र, पोस्टकार्ड इत्यादिंचे तेवढे महत्व वाटत नाही.
गेली पंचवीस-तीस वर्षांपूर्वी पत्र हे अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. हळूहळू मात्र पत्रांचा वापर कमी होत गेला आणि आज या पत्रांची जागा
इंटरनेट
इमेल्स
व्हाटस्अप
इंस्टाग्राम
फेसबुक
ट्विटर
टेलिग्राम
या सारख्या सोशल मीडियाने घेतली आहे. परंतु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जरी आपण एकमेकांशी जोडलेलो असतो तरी मनाने मात्र फार लांब झालो आहे. विज्ञानाच्या क्रांतीमुळे आज संपूर्ण जग एका गावासमान झाले आहे.
पूर्वी असा असायचा समज
जेव्हा एखादी तार, टेलिग्राम यायचे तेव्हा काही तरी वाईट घटना घडल्याची वार्ताच असेल असे समजले जायचे आणि पत्र आले म्हणजे काही तरी आनंदाची बातमी आहे. लग्नात बोलविण्यासाठी केवळ पोस्टकार्डवर हळद शिंपडून पाठवली जायची म्हणजे घरात लग्न आहे आपण हजर रहावे असा संदेश त्यातून दिला जायचा.
आजची परिस्तिथी...
आज अशी परिस्थिती आहे की, दिवसभरात एखाद्याला अनेक वेळा फोन केले तरी काही ना काही सांगायचे राहनच जाते. परंतु ज्या काळात पत्र लिहिली जायची ती अगदी विचारपूर्वक लिहिली जायची.
मात्र पात्रच आनंदच वेगळा....
घरापासून लांब राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याची खुशाली त्या पत्राद्वारे माहित व्हायची त्यातला आनंदच वेगळा होता. पत्रातील त्या शब्दातुन आपलेपणा व्यक्त होत असते. आज हातोहात स्मार्टफोन आहेत आणि इंटरनेटची त्याला जोड मिळाली असल्याने आपण एकमेकांशी अगदी जुळले गेलेलो आहे. संवाद माध्यमाची उपलब्धतता झाल्याने पत्र लेखन, टपाल पेटी हे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. मिनिटा मिनिटांची माहिती, विचारपूस करणे स्मार्टफोन्सद्वारे शक्य झाले आहे.त्यातला त्यात कुठे आहेस हे जाणून घेण्यासाठी विडिओ कॅल्लिंग ची हि सोय.... गेले ते दिवस जेव्हा पत्र लिहून एकमेकांविषयी आस्थेने विचारपूस केली जायची. खरंच ते फारच अविस्मरणीय दिवस होते. पत्रातील शब्द, मायेचा ओलावा थेट हृदयाला भिडत असे. आज किंवा येणारी पिढी कदाचित पत्रलेखन या विषयापासून अलिप्तच राहील. कारण, पत्र काय आहे हे अजूनही बहुतांश मुलांना माहित नसते. हल्ली इंटरनेट, मोबाईल उपलब्ध झाल्यामुळे पत्राचे महत्त्व कमी झाले आहे. त्याचबरोबर आपसातल्या संबंधांचा दृष्टिकोनही बदललेला दिसतो.
सामाजिक सरोकार आणि कौटुंबिक ओळख यात औपचारिकतेचा समावेश झाला आणि पत्रांचा अर्थच बदलून गेला. परंतु त्यात जे मानवी पैलू होते त्याला नाकारता येणार नाही. अंत:करणात उतरणारे पत्रातील शब्द, आज मोबाईलच्या आवाजात परावर्तित झालेले आहेत. लोक टेलिफोनमोबाईल वरच आवश्यक बोलणे करून संवाद कायम राखण्याची औपचारिकता पूर्ण करीत आहे. तसे पाहता या उपकरणांमुळे लोकांशी संपर्क बनवून राखणे सुलभ झाले आहे. एका सेकंदात कोणत्याही परिचित अथवा संबंधित व्यक्तिशी बोलणे या फोनच्या माध्यमातून अगदी सोपे झाले, परंतु या नव-नवीनतेमुळे जीवनातील काही खास वस्तू म्हणा किंवा काही गोष्टी आपल्यापासून दुरावत आहेत. ज्या आपण फक्त आठवणीत ठेवू शकतो. या बदलांसमोर गंभीरतेने लक्ष दिले गेले तर पत्रसंवाद हे काही क्षुल्लक कारणांमुळेच नाहीसे झाले आहे. त्यातले पहिल कारण संचार माध्यमात आलेली गती होय, हे अधिक महत्वपूर्ण आहे.
सहज साधता येते सातासमुद्रापार
आता तर सातासमुद्रापार असलेल्या आपल्या नातेवाईकाशी इंटरनेटच्या माध्यमातून सहजपणे संपर्क साधला जातो. यामुळेही पत्रलेखन नाहीसे होत चालले आहे. अप्रत्यक्ष संवाद म्हणून पत्रलेखन होत असे. हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद घडून येतो. या माध्यमाचा शहर-गांव सर्वत्र वापर होऊ लागला. परिणामी पत्र लिहिणे ही क्रिया जवळजवळ राहिलीच नाही. संदेश वहनाकरिता गतिशील उपकरण, साहित्य उपलब्ध झाल्यामुळे पत्रलेखन करायची सहसा बहुतेकांची ना असते. असे असले तरी कागदावर पत्र लेखनातील शब्दांमध्ये जी भावनिकता, आपलेपणा होता तो या स्क्रिनवरील संदेशात दिसून येत नाही.
पत्रात जवळ असल्याचं भाव निर्माण होतो
पत्र लिहिणारा आणि वाचणारा हे दोघेही एकमेकांपासून दूर असले तरी लिहितांना किंवा वाचतांना एकमेकांच्या जवळ असल्याचा भाव येतो. पत्रलेखनाची विशेषता होती, जेव्हा पत्र वाचतांना आपसूकच डोळ्यात पाणी यायचे. आज सर्व संदेश, निरोप, निमंत्रण, अभिनंदन सांत्वन मोबाईलवर आणि ते सुद्धा फार थोड्या अवधितच घरबसल्या होऊ लागले. सोपे झाले असले तरी पत्रलेखन करायलाच हवे हे या ठिकाणी विशेष सांगावेसे वाटते. केवळ मोबाईल व्हॉटसएपद्वारे एकमेकांची खुशाली न घेता तेच जर पत्रातून घेतली तर अधिकपणे, चांगल्या त-हेने लिहिता येते. शिवाय लिखाणाची सवयही जडते. आजही आपण पत्र लिहू शकतो. इथे एक सांगावेसे वाटते की केवळ पत्र लेखनाचे चलन कमी झाले आहे परंतु पोस्टमन, पोस्ट ऑफिस आजही आस्तित्वात आहेत. पत्रलेखनातून आपलेपणाची जाणीव होतेच शिवाय हा संवाद आपलेपणाची अनुभूती देणारा दुवा ठरतो. म्हणूनच अधून-मधून पत्र लेखन केल्यास नात्यांची गुंफण अधिक दृढ होत जाईल.
फास्ट कम्युनिकेशनच्या युगात माणूस हा माणसापासून दूर जात आहे ...
आजच्या फास्ट कम्युनिकेशनच्या युगात साधने भरपूर झाली आहेत, पण माणूस हा माणसापासून दूर गेला. कुणी कुणाचे कौतुक करीत नाही. एखाद्याकडे मृत्यूची घटना झाली तर सांत्वनपर भेटायला जायलाही कुणाकडे वेळ राहिला नाही. नुकतेच कोरोना नामक संकटाशी आपण दोन हात करीत आहोत. त्यातल्या त्यात लॉकडाऊन काय असते तो अनुभव आपण घेतला. या दरम्यान संवाद साधण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक तर होतेच शिवाय आता अनेक औद्योगिक, खासगी संस्थांनी वेबिनारद्वारे लोकांशी संवाद साधला. चर्चात्मक कार्यक्रम, माहितीपर ऑनलाईन कार्यक्रमाची मेजवानीच वेबिनार द्वारे शक्य झाली. या सगळ्यात मात्र टपालपेटी मागे पडली. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी अशी अवस्था टपालपेटीची झाली आहे. पण या आठवणी ते टपाल, पत्र, पोस्टकार्ड म्हणजे आनंदाची पर्वणीच असायची.
डिजिटल इंडिया
डिजिटल इंडिया मोहीम ही भारत सरकारने सुरु केलेली एक मोहीम आहे. याचा उद्देश, शासकीय सेवा ही प्रत्येक नागरीकांना इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करुन देणे असा आहे.यासाठी ऑनलाईन आधारभूत संरचना जास्त चांगली करण्यात येत आहे व आंतरजालाची जोडणीपण सुधरविण्यात येत आहे.देशाच्या तांत्रिकक्षेत्रास डिजिटलरित्या उच्च पातळीवर नेणे असाही एक हेतू यामागे आहे.
ही मोहिम दि २ जुलै २०१५ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी. यांचेतर्फे विमोचित करण्यात आली.या योजनेद्वारे, ग्रामीण भारतात उच्च गतीच्या आंतरजालास उपलब्ध करुन देणे असाही एक उद्देश आहे.
0 Comments