पुरुषोत्तम पुरस्कार पानीपतकार लेखक विश्वास पाटील तर संस्था पुरस्कार नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपूरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान...

 पुरुषोत्तम पुरस्कार पानीपतकार लेखक विश्वास पाटील तर संस्था पुरस्कार नाम फाऊंडेशनचे मकरंद   अनासपूरे यांना  मान्यवरांच्या हस्ते प्रदान...


शहादाः पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन व पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व्दारे सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित विचार मंथन,किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभा प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक बापू पाटील, आ.राजेश पाडवी,भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी,खा. गोपिचंद गुर्जर, उपविभागीय दंडाधिकारी डॉ.चेतन गिरासे,पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडाळाच्या कमलताई पाटील,तहसीलदार डॉ.मिलींद कुलकर्णी,अखिल भारतीय गुर्जर महासभेच्या रेणु चौधरी,पुढे बोलतांना अनासपूरे म्हणाले,माणसा वाद नको म्हणून राजकारण विरहित हे काम केले जात आहे.  पुरुषोत्तम पुरस्काराचा विनीयोग झाला पाहिजे त्यासाठी पुरस्काराची रक्कम तालुक्यातील चिंचोरा गावात सुरु असलेल्या पाण्याच्या कामाला प्रदान करीत आहोत. साने गुरुजींच्या वैचारीक प्रभाव कै.पी.के.अण्णा पाटील यांच्यावर झाल्याने एका रोपट्याचे वटवृक्ष झाले आहे.पी.के.अण्णांच्या कार्यामूळे हा परिसर संपन्न झाला आहे आणि त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.  

यावेळी दीपक पाटील म्हणाले की,जिद्दीतून माणूस घडतो.वाद विवाद सहन करुन कै.पी.के.अण्णा पाटील यांनी आपले कार्य केले. विश्वास पाटील म्हणाले की,कोरोनाने माणसाचे जीवन क्षणभंगुर असल्याचे दाखवून दिले.तोंड दाबून बुक्क्यांचा मार कोरोनामूळे खावा लागत आहे.पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित होणे हि भाग्याची बाब आहे.कै.पी.का.अण्णा पाटील कर्तत्वूचा झरा आहे.क्रांती खर्या अर्थाने कै.पी.के.पाटील यांनी या भागात पेरली आहे.पानीपतची ओळख गुरुजींनी माझ्या हातावर छडी मारून करून दिली.चिकाटी बाळगणारे,भिडणारे अशीच व्यक्ती माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत.पानीपत नंतर शिवराय हि कादंबरी इतिहासाचे दर्शन देते.दुष्काळातील लोकांचे दुःख बघणारे आणि त्यांची मदत करणारे फार कमी आहेत. आ.राजेश पाडवी, गुर्जर समाजाचे बच्चूसिंह बैसला, रेणु चौधरी,खा.गोपिचंद गुर्जर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदींनी मनोगते व्यक्त केलीत.






         व्यक्ती स्तरावरील पुरस्कार पानीपतकार लेखक विश्वास पाटील तर संस्था पुरस्कार नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपूरे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments