लायन्स क्लबच्या “सेवा सप्ताह” ला सुरुवात...

 लायन्स क्लबच्या “सेवा सप्ताह” ला सुरुवात...

लायन्स क्लब, नंदुरबार  दर वर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान  ”सेवा सप्ताह” साजरा करत असतो. या सप्ताहात दर दिवशी थीम नुसार सेवा प्रकल्प घेण्यात येतात. 

यंदाच्या वर्षी या उपक्रमाची सुरुवात महात्मा गांधी जयंती दिनी पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर स्वच्छता अभियान अंतर्गत रेल्वे स्टेशन ची स्वच्छता करण्यात आली.व डस्ट बीन देण्यात आलेत

दिव्यांग सहायता अभियान अंतर्गत भालेर येथील विद्यार्थ्यास सायकल व इतर व्यक्तींना कॅलिपर्स प्रदान करण्यात आले.कॅन्सर जागरूकता अभियानात धुळे येथील खानदेश कॅन्सर सेंटर चे प्रमुख कॅन्सर तज्ञ डॉ.भूषणभाई वाणी यांचे नागरिकांसाठी झूम मिटिंग द्वारे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

आरोग्य जागरूकता अभियानात शहरातील घंटा गाडी वरील सर्व सफाई कर्मचारी यांना आरोग्य प्रबोधन करून मास्क, सॅनिटायझर इ॰ पुरवण्यात आले.पोषण आहार अभियान अंतर्गत गुरव चौकातील लहान मुलांना एकत्र करून , तसेच कोव्हीड सेंटर मधील रूग्णांना पोषण आहार वाटप करण्यात आले. 

सप्ताहात समारोपात साईट फर्स्ट उपक्रमा अंतर्गत शहरातील कांता लक्ष्मी नेत्र रुग्णालयास भेट देऊन तेथील गरजा जाणून घेण्यात आल्यात व रुग्णालयास मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर पुरवण्यात आले. सदर सेवा प्रकल्प घेण्यासाठी प्रत्येक दिवशी दोन प्रोजेक्ट चेयेरमन अशी रचना केली होती.

  


लायन्स क्लब अध्यक्ष ला. डॉ.राजेश कोळी, सचिव ला॰डॉ.रवींद्र पाटील, ट्रेझरर ला. डॉ.चेतन बच्छाव यांनी सप्ताहाचे संयोजन केले. 

सेवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून ला॰ रविंद्र पोतदार, ला.  बाबूशेठ नानकाणी, ला.  शेखरभाऊ कोतवाल, ला.  दिलीपभाई जैन, ला॰ राजूभाई माहेश्वरी, ला.  डाॅ. अनिलभाई शाह, ला॰ श्रीराम दाऊतखाने, ला. सतीष चौधरी, ला.  आनंद रघुवंशी, ला. संदीप गुरूबक्षाणी, ला.  सुमित सराफ, ला. राहूल पाटील, ला.  संजय सोनार यांनी , तसेच क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments