आष्टे येथील शेतकऱ्यांना कृषि अप्स बाबतीत प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनी कडून माहिती.
आष्टे - ग्रामीण जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेली नंदुरबार कृषि महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील संप्रिया यशवंत कोकणी या विद्यार्थ्यांनीने आष्टे, ता. नंदुरबार येथे शेतकऱ्यांना कृषि अॅप्स बाबत माहिती दिली. शेतकऱ्यांना एकत्र करून कृषि क्षेत्रातील विविध उपलब्ध मोबाईल अॅप्लीकेशनची माहिती देऊन प्रत्यक्ष प्रत्यक्षिक करून दाखवले तसेच समस्यांचे निराकरण केले. संप्रिया यशवंत कोकणी हिला महाविद्यालयातील प्राचार्य डाॅ. एस. बी. खरबडे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments