जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करावा
शिक्षक परिषदेतर्फे संबंधितांना निवेदन...
नंदुरबार : प्रतिनिधीजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे दरमहा वेतन सातत्याने अनियमित होत आहे. यापुढे शिक्षकांचे दरमहा वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्हा
शिक्षकांना आर्थिक भुर्दड
" नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन सातत्याने अनियमित होत असल्याने बँक हप्ते थकतात. अनियमित वेतनामुळे शिक्षकांना आर्थिक भुर्दंड बसत असतो. आर्थिक नियोजन ढासळत असते. यावर उपाय म्हणून राज्यातील इतर जिल्हा परिषदांच्या धर्तीवर नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतनही सीएमपी प्रणालीचा अवलंब करुन जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन नियमित करण्यात यावे. महाराष्टात जालना जिल्ह्यासह परभणी. हिंगोली. सोलापर, बुलढाणा, उस्मानाबाद या जिल्ह्यात प्रणाली यशस्वी ठरली आहे. वेतनास होणारा विलंब टाळला गेला आहे. त्याच धर्तीवर नंदुरबार जि.प. प्राथमिक शिक्षकांचे दरमहा वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात यावे, व जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनियमित होणाऱ्या वेतनाबाबतचा प्रश्न परिषद प्रशासनाकडे करण्यात आली. अशा आशयाचे निवेदन शिक्षक परिषदेने जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जि.प.शिक्षण सभापती कांचन पाटील तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांना नुकतेच देण्यात आले. सोडवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सीएमटी प्रणालीद्वारे वेतन प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगारखाती स्टेट बँकमध्ये असणे आवश्यक आहे. ज्यांची खाती स्टेट बँकेत नसतील अशांनी आपली पगार खाते स्टेट बँकेत वर्ग करुन या सीएमपी प्रणालीद्वारे होणाऱ्या वेतन प्रक्रियेस सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. निवेदनावर राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे, राज्य कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण बागल, जिल्हाध्यक्ष आबा बच्छाव, जिल्हा कार्यवाह नितेंद्र चौधरी, जिल्हा संघटनमंत्री राकेश आव्हाड, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश बोरसे, दिनेश मोरे, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष सावंत, महिला आघाडी प्रमुख चेतना चावडा, मिनल लोखंडे, किरण पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments