आ.पाडवी जिल्हाध्यक्ष यांनी साधला रुग्णांशी संवाद

 जिल्हा रुग्णालयात रुग्णांची भेट घेत आस्थेने चौकशी…..



 नंदुरबार) प्रतिनिधी जिल्ह्यातील कोविड रुग्णांकडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी आ.राजेश पाडवी यांच्या समवेत तातडीने जाऊन पॉझिटिव्ह रुग्णांची भेट घेत आस्थेने चौकशी केली. कोविड रुग्णांची चांगली सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. दरम्यान, भेटीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी समस्या मांडल्यावर येत्या पाच दिवसात ५० लाख रुपयांचे रेमडेसिव्हर इंजेक्शन प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीही प्रत्यक्ष भेट घेतली. भेटीत पॉझिटिव्ह रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारणा केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ.राजेश पाडवी यांनी रुग्णांशी थेट संवाद साधला. आपणास जेवण चांगले मिळते का? स्वच्छता असते का? डॉक्टर नियमित तपासणी करीता येतात का? अन्य काही अडचण आहे का? असे प्रश्न विचारले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, भाजपचे कैलास चौधरी, ऋषिकेश चौधरी आदी उपस्थित होते.


रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करणारः

जिल्हाधिकारी " नव्याने उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लान्टची पाहणी केली. रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे निर्दशनास आल्यावर तात्काळ त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली.तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क करीत लेखी पत्रही दिले. त्यावर जिल्हा अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ५० लक्ष रुपयांचा इंजेक्शन पुरवठा तात्काळ येत्या ४ ते ५ दिवसात उपलब्ध करू असे आश्वासन दिले. नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच अशा पद्धतीने थेट कोरोना रुग्णांशी संपर्क साधून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात कोरोनाच्या भीतीने सर्वच राजकीय नेते घरात बसून आहे. मात्र, नंदुरबार जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व आ.राजेश पाडवी यांनी थेट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची विचारपूस केल्याने त्यांची रुग्णाबद्दल असलेल्या आस्थेविषयी जनतेतून कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments