जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बसेस पूर्ववत सुरू करा ; तालुका ग्राहक पंचायतसह प्रवासी महासंघाची मागणी...
नंदुरबार प्रतिनिधी-गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे ग्रामीण भागातील लालपरी अर्थात एस.टी. सेवा बंद आहे. मात्र, आता परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. लांव पल्ल्याप्रमाणे ग्रामीण भागातील बसेस नियमितपणे सुरू करण्यात यावी, अशी मागणी नंदुरबार तालुका ग्राहक पंचायत आणि प्रवासी महासंघात. अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केली आहे. अशा आशयाचे निवेदन राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ आणि नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांना नुकतेच देण्यात आले. निवेदन नंदुरबार आगाराचे वाहतूक निरीक्षक आर.जी. वळवी यांनी स्विकारले.
" अनलॉक-५ मध्ये एस.टी. सेवेचा विस्तार वाढून लांब पल्ल्यांच्या फेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या. नंदुरबार आगारातून सध्या धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, औरंगाबाद, पंढरपूर सारख्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागात लालपरी बंद असल्याने ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय होत आहे. दररोज शहरी भागात वैद्यकिय, बाजारहाट व इतर कारणांसाठी यावे लागते. लवकरच शासनाने शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील असंख्य नागरिक रोजगारासाठी शहरात येतात. म्हणून तातडीने ग्रामीण बससेवा सुरु करण्यात याव्या. तसेच नंदुरबार बसस्थानकावरून जिल्हा रूग्णालय, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद, आर.टी.ओ. कार्यालयापर्यंत मिनी बस सुरू करण्याबाबत ग्राहक पंचायतीने यापूर्वीच निवेदन दिले आहे. याबाबत फेऱ्यांचे नियोजन करण्याची मागणी नंदुरबार तालुका ग्राहक पंचायत
0 Comments