मावर्सवादी कम्युनिस्ट पक्ष नंदुरबार तालुका कमिटीच्यावतीने हाथरसच्या दलित मुलीवरील सामुदायिक बलात्कार आणि तिची हत्या करणार्यांना फाशीची मागणी ...

मावर्सवादी कम्युनिस्ट पक्ष नंदुरबार तालुका कमिटीच्यावतीने हाथरसच्या दलित मुलीवरील सामुदायिक बलात्कार आणि तिची हत्या करणार्यांना फाशीची मागणी ...



मावर्सवादी कम्युनिस्ट पक्ष नंदुरबार तालुका कमिटीच्यावतीने खालील विषय घेऊन निवेदन सादर करीत आहोत की, उत्तर प्रदेश राज्यात हाथरसच्या दलित मुलीवरील सामुदायिक बलात्कार आणि तिची हत्या झालेली आहे. धर्मांध गुंडांना फाशी झाली पाहिजे ही मागणी घेवुन भाजपाच्या योगी सरकारने सीबीआय व न्यायालयीन चौकशी करुन पिडीत कुटुंबांना न्याय दिला पाहिजे. भाजपाचे सरकार असल्याने मनुवादी व जातीयवादी गुंडांना प्रोत्साहन मिळाले असून त्यांना राजकीय आश्रय मिळत आहे. त्याबद्दल आम्ही योगी सरकारचा धिक्कार करीत आहोत व पिडीत मुलीच्या कुटूंबाला संरक्षण मिळुन हत्या करणाऱ्या गुंडांना जलदगतीने कोर्टात न्याय करुन फाशी ताबडतोब दिली पाहिजे ही महत्वाची मागणी या निवेदनात करीत आहोत.वरील आमची मागणी व आमच्या भावना वरीष्ठ स्तरावर पोहोचवाव्या ही नम्र विनंती आहे.

निवेदनात विश्वासू शिष्टमंडळ नथू साळवे,नर्सिंग वसावे, शांताराम गिरधर् भिल्, विक्रम वळवी, सानू भिल, रामसिंग मोरे, शिवराम भिल यांच्या साह्य आहेत

Post a Comment

0 Comments