एन एस ई फाउंडेशन तर्फे कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयासाठी 33 लाख रुपये किमतीचे साहित्याची मदत
नंदुरबार : एन एस ई फाउंडेशन मुंबई व आयसँप नवी दिल्ली या संस्था मार्फेत हाय- फ्लो नँजल क्यानूला
मशिन कोविड - 19 सेंटर जिल्हा रुग्णालय नंदूरबार यांना एकूण 10 मशिन देण्यात आले. एका मशीनची
किंमत तीन लाख 39 हजार रुपये आहे याप्रमाणे एकूण दहा मशीनचे 33 लाख 90 हजार एवढी किमतीचे
मशीन देण्यात आले त्यामुळे कोविंड रुग्णांसाठी जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल व बरे होण्यात मदत होईल
या कार्यक्रामाच्या वेळी सिव्हिल हाॅस्पिटलचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीसक डाॅ. कांताराव सातपूते ,
डाॅ.राजेश वसावे , डाॅ.राहूल वसावे , तसेच डाॅ.मनिषा पाटील यांना मशिनचे प्रात्यिक्षक करून दाखविण्यात आले
या प्रसंगी कार्यक्रामाला आयसँप संस्थेकडून प्रकल्प समर्थचे प्रमुख श्री शैबल चॅर्टजी सर, नवी दिल्ली यांचे कुशल मार्गदर्शन लाभले असून, या कार्यक्रमाला प्रकल्प समर्थ चे जिल्हा व्यवस्थापक परशूराम आंबरे, डाॅ.राजेंद्र आगळे तसेच प्रकल्पाचे तालुका समन्वयक बाळासाहेब घुले, विशाल घरटे, हरिष मोरे, दिनेश पावरा यांनी कार्यक्रामासाठी मेहनत घेतली
0 Comments