नवापूर राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार उठाव संघ नवापूर तर्फे हाथरस येथे झालेल्या तरुणीवर अत्याचार निषेध निवेदन...
नवापूर-ता ८ उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्हाातील एका खेडेगावातील मनिषा वाल्मिकी ह्या दलित तरुणीवर अमानुष बलात्कार करुन जीवे ठार मारणा-़या उच्च समाजातील गुंड प्रवृत्तीच्या युवकांना शासन होणे बाबत चे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार उठाव संघ नवापूर यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड,नवापूर नायबतहसिलदार अरविंद गावीत व नवापूर पोलिस निरीक्षक विजसिंग राजपूत यांना दिले आहे.
निवेदना मध्ये म्हटले आहे की नंदुरबार जिल्हा येथील चर्मकार समाजाचे बांधव तसेच पदधिकारी आपणाकडे निवेदन सादर करीतो की उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्हाातील एका खेडगावात राहणा-या एका दलित परीवारातील शिक्षण घेत असलेल्या मुलीवर उच्च जातीतील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार करुन तिच्या शरीरातील हाडे तोडली,तिने कोणाला काही सांगू नये म्हणून तिची जीभ कापली व गळा दाबून ठार मारण्याचे कृत्य केलेले आहे.
सदर मुलीचे वय हे केवळ १९ होते व मृत्यूपुर्व तिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार ती गुरांना चारा देण्यास जात असतांना तिच्यावर लक्ष ठेवून असलेल्या उच्च जातीतील या गुंडयांनी कायद्याची कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता सदरचे दृष्कृत्य केलेले आहे.तरी आम्ही समस्त चर्मकार समाजाचे बांधव, पदधिकारी आपणाकडे निवेदन देतो की हे दृष्कृत्य करणा-या नराधमांना योग्य शासन व्हावे,फास्ट ट्रॅक न्यायालयात दावा दाखल करुन या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी.तसेच यानंतर मानवी जिवनास अशोभनिय असा प्रयत्न कोणीही करु नये बाबत आपण आपल्या स्तरावरुन प्रयत्न करुन यांना शासन करण्यात यावे बाबत आम्ही आपणास विनंती करीत असून याबाबत योग्य ते शासन या नराधमांना करणेकामी सहकार्य करावे बाबत आम्ही आपणास विनंती करीत आहोत.सदरचे निवेदन आम्ही समस्त चर्मकार समाज बांधव चर्मकार उठाव संघाचे संस्थापक अध्यक्ष चर्मकार हदय सम्राट अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली देत आहोत.
तरी कृपया आमचा याबाबत असलेला निषेध हा आपण आपल्या मार्फत राष्ट्रपती,पंतप्रधान,राज्यपाल,मुख्यमंञी व तत्सम अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवावे ही विनंती असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र अहिरे,चर्मकार उठाव संघाचे जिल्हा अध्यक्ष छोटु अहिरे,विजय तिजविज,लक्ष्मण चव्हाण,पंकज अहिरे,जयेंद्र चव्हाण,विजय अहिरे यांच्या सह्या आहेत.
0 Comments