रविवारीही सुरु राहणार बाजारपेठ
५ ऑक्टो. पासून हॉटेल व बारदेखील सुरु होणार -जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नंदुरबार : जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील, तथापि ऑनलाईन शिक्षणास परवानगी राहील. चित्रपटगृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्समधील) सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या संख्येने लोक प्रमाणात घेण्यात येणारे मेळावे किंवा कार्यक्रम प्रतिबंधीत असतील. दुकाने व मार्केट रविवारीदेखील सुरु मॉल आणि व्यावसायिक संकुल (मार्केट कॉम्प्लेक्स), दुकाने, आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये पूर्णवेळ सुरू राहतील. पाचपेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील.
रविवारीदेखील दुकाने, मार्केट, आस्थापना निर्धारित वेळेत सुरू राहतील. यापूर्वी परवानगी दिलेल्या बाबी पूर्ववत सुरू राहतील.
५ ऑक्टो. पासूनहॉटेल/रेस्टॉरंट्स सुरु
५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, फूट कोर्ट्स, रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरु राहतील. या आस्थापनांसाठी पर्यटन विभागाकडून स्वतंत्र आदर्श कार्यप्रणाली देण्यात येईल, तिचे पालन करणे बंधनकारक राहील. ऑक्सिजन उत्पादन व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या हालचालीस जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे वेळेचे अथवा इतर बंधन असणार नाही. कामाचे व इतर सर्व ठिकाणी आणि प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य आहे.
0 Comments