आष्टे येथील कृषिकन्याकडून चारा प्रक्रिया विषयी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन.
नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे ग्रामीण कृषिविषयक जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय नंदुरबार येथील कृषिकन्या संप्रिया यशवंत कोकणी हिने शेतीविषयक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना वाळलेल्या चारा प्रक्रिया कशी करावी याविषयीचे प्रत्याकक्षिक दाखवून मार्गदर्शन केले
वाळलेला चारा प्रक्रिया म्हणजे काय, त्यासाठी आवश्यक साहित्य त्या प्रक्रियेचे फायदे, दुग्धाच्या उत्पादनात वाढीवर परिणाम, गुणवत्ता वाढ, फॅट पर्सेंट मध्ये वाढ होते. याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच वाळलेला चारा प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक ही करून दाखवले. यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचे प्रमाण किती असावे व कसे काढावे याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले
संप्रिया यशवंत कोकणी हिला शासकीय कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. बी. खरबडे व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. स्तुत्य अशा या कार्यक्रमाचे आष्टे परिसरातील शेतकऱ्यांनी स्वागत केले.
0 Comments