नंदुरबार येथे महर्षी वाल्मिक ऋषी, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन...

                    जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन... 

नंदुरबार दि. 31-जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अभिवादन केले. डॉ.भारुड यांनी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, शाहूराज मोरे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. यावेळी एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.

 यावेळी एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेताना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड,उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, शाहूराज मोरे, तहसीलदार उल्हास देवरे  


नंदुरबार काँग्रेस पक्षातर्फे अभिवादन 
नंदुरबार काँग्रेस पक्षातर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम प्रसंगी  उपस्थित माजी मंत्री पद्माकर वाळवी सोबात जिल्हा परिषद अध्यक्षा  सीमा वळवी, दिलीप नाईक, रतन पदवी, नरेश पवार, इकबाल खाटीक यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते 



                 रक्तदान करून नंदुरबारला महर्षी वाल्मिक ऋषी जयंती साजरी


नंदुरबार प्रतिनिधी येथील कोळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रतिमापूजन आणि रक्तदान करून महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली.

 यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेश कोळी, डॉक्टर चेतन बच्छाव, प्राध्यापक भास्कर कुवर ,नगरसेविका सौ. कल्याणी मराठे,अनिल पाटील, अर्जुन मराठे, देवीदास वाघ, अर्जुन सुधाकर मराठे आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  यावेळी सेवानिवृत्त झाल्याबद्दल देवीदास वाघ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वाल्मिक जयंतीनिमित्त लायन्स क्लब आणि कोळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात 25 तरुणांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोळी समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दादाभाई कोळी  उपाध्यक्ष घारू कोळी, कमलेश कोळी, भैय्या कोळी, सागर कोळी, चेतन वाघ, आदींनी परिश्रम घेतले. शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टिंगचे पालन करून कोरोना संकट टाळण्यासाठी यावर्षी साध्या पद्धतीने महर्षी वाल्मिक ऋषी जयंती साजरी करण्यात आली.

                          लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्यावतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले 

                               

नंदूरबार(प्रतिनिधी) - नंदूरबार येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्यावतीने नंदूरबार शहरातील नगर परिषदेसमोर असलेल्या हुतात्मा गार्डन मध्ये असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

        यावेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, अनिल शर्मा, फकरूद्दीन जलगूनवाला, संदीप गुरुबक्षानी, प्रा.डॉ. राहुल मेघे, रोट्रॅक्टर दादा माळी आदी. उपस्थित होते

Post a Comment

0 Comments