वनवासी विद्यालय एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयआयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न...

 वनवासी विद्यालय एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयआयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न... 



वनवासी विद्यालय एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, चिंचपाडा येथे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचनाचे महत्त्व या विषयावरऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन  स्पर्धेत भाग घेतला.या स्पर्धेत इयत्ता अकरावी ची विद्यार्थिनी कुमारी किशोरी अशोक पाडवी हिने प्रथम क्रमांक पटकावला. किशोरी ने वाचनाचे महत्त्व व  वाचनाने जीवनात माणूस किती समृद्ध होतो हे आपल्या  शैलीतून सुंदर प्रकारे समजावून दिले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक  बी एम निकुंभ ,  पर्यवेक्षिका एम एन गांगुर्डे, ए एस पाडवी, पी एच पाडवी , आर आर गावीत,आर डी सोनवणे, व्ही एस सपकाळ, ग्रंथपाल एस जी वळवी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एल कुलकर्णी व आभार प्रदर्शन पी जी देसले यांनी केले. विद्यालयातील या उपक्रमाचे व किशोरी पाडवीचे संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास नटावदकर यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments