काल्लेखेतपाड्याची 'ग्लोबल' भरारी

काल्लेखेतपाड्याची 'ग्लोबल' भरारी...   



होय, काल्लेखेतपाडा गुगल मॅप शोधायला गेलो तर आजही सापडणार नाही....! सातपुड्याच्या दुर्गम अजस्त्र डोंगररांगा ,  उतुंग डोंगर, खोल दऱ्या, नदी नाले असंच काहीसे वर्णन नंदूरबार जिल्हयातील धडगाव तालुक्याची करता येईल.. ! दुर्गमता, अज्ञान, अंधश्रद्धा, आरोग्य, शिक्षण अशा समस्यांनी ग्रासलेल्या या धडगाव तालुक्याच्या  नव्हे तर नंदूरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून 'ग्लोबल भरारी' घेतली आहे ते ही एका पाड्यावरच्या शाळेने..! धडगाव तालुक्यातील उमराणी बु या गावाचा पाडा असलेल्या काल्लेखेतपाडा या पाड्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा ( उमराणी बु) ता. धडगाव जि. नंदूरबार  जगभरातील दर्जेदार शिक्षणाकरिता अग्रगण्य असलेल्या  प्रतिष्ठित जगातील 100 शाळांच्या ग्लोबल शोकेस साठी निवड झाली..  ही निश्चितच महाराष्ट्र आणि नंदूरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे...!!

    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा ही शाळा सहा खंडातील हजारो शाळांमधून निवडली गेली आहे आणि ऑक्टोबर २०२० च्या सुरुवातीस ऑनलाईन होणार्‍या उद्घाटन जागतिक शैक्षणिक आठवड्यात महाराष्ट्रातील  सरकारी शाळांपैकी एक आहे.  आयोजकांच्या मताने  हे 'जगातील सर्वात मोठी शिक्षण परिषद' म्हणून याची दाखले देत आहेत.

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा ता. धडगाव जिल्हा नंदूरबार  ही शाळा महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या  ग्यानप्रकाश फाऊंडेशन सह एक तासाच्या व्हर्च्युअल कार्यक्रमाचे भाग असणार आहे...   

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा या शाळेवरील लाईव्ह व्हर्चुअल म्हणजेच ऑनलाईन  इव्हेंट येत्या 8 ऑक्टोबर 2020, दुपारी 13:00 ते दुपारी 14:00 GMT (इंडियन टाइमझोन 6.30 PM: ते 07:30 PM  IST) ... च्या दिवशी.. जागतिक स्तरावर प्रसारित होईल..


       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा  ही शिक्षण क्षेत्रात दुर्गमता, निरक्षरता, अज्ञान, शाळेला स्वतःची बिल्डिंग इथून १४ मुलांसोबत सुरू झालेल्या या वस्ती शाळेचा प्रवास आज एक १४० मुलांच्या सोबत घेऊन जागतिक ग्लोबल भरारी घेण्याच्या  दिशेने जाणारा प्रवास दाखवणारी थक्क करून प्रेरणा देणारी  आहे... हे नेमके कसं घडलं आणि त्यामागे असलेल्या मेहनतीचे सादरीकरण या लाईव्ह व्हर्चुअल इव्हेंट मध्ये देण्यात येणार आहे....!!

 ‘उद्याचे भविष्य इथे किलबिलते ’ हे  ब्रीदवाक्य घेऊन  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा ही शाळा चालविली जाते सन 2001 मध्ये श्री तेगा पावरा यांच्या वस्ती शाळेचे 2009 मध्ये आलेले शिक्षक श्री रुपेशकुमार नागलगावे यांनी शाळेत मुलांची पटनोंदनी करून  पालक आणि समाजाला यात सामील करत यशाचे बीजारोपण केला आहे..   २००८  ते २०२० या कालावधीत पालकांनी, शा. व्य. समिती आणि ग्रामपंचायतींच्या मदतीने पटनोंदनी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि शाळेत शिक्षण सामग्रीची तरतूद करणे यासाठी शिक्षकांच्या प्रयत्नांच्या परिणामी शाळेत पटनोंदनी 14 वरून 140 पर्यंत वाढली. आज या शाळेवर श्री. लक्ष्मीपुत्र उप्पीन, श्री. तेगा पावरा, श्री दशरथ पावरा हे सहकारी शिक्षक आहेत.

 आता शिक्षक, पालक, एसएमसी आणि ग्रामपंचायत शाळेतील सर्व मुलांसाठी ग्रेड-स्तरीय शिक्षणाचे निकाल सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.  बाल निहाय कृती आराखडा तयार करण्यावर आणि त्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.  प्रत्येक मुलाची प्रगती नियमितपणे पालक आणि शा. व्य. समिती समोर  सामायिक केली जाते.  संयुक्त शिक्षक आणि गावाच्या व समाजाच्या  प्रयत्नांमुळे अभ्यास गट, अभ्यासाचे कोपरे, पालकांची जागरूकता सभा, मुलांची बालसंसद प्रभावीपणे आयोजित केली जाते.  शालेय निरंतर सुधारण्यासाठी जिल्हा व तालुका अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या सहकार्याने शाळा यशस्वी वाटचाल करीत आहे।...! 

           शिक्षणातील लोकसहभाग, पालक संपर्क व समाजाशी असलेल्या शिक्षकांच्या सुसंवाद या विषयावरील या परिसंवादात शाळेची निवड झाली असून महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त मा. श्री विशाल सोळंकी हे काल्लेखेतपाडा शाळेविषयी या जागतिक लाईव्ह इव्हेंट मध्ये बोलणार आहेत.. ही निश्चितच एका दुर्गम आदिवासी भागातील शाळेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे... तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री रुपेशकुमार नागलगावे, सहशिक्षक श्री लक्ष्मीपुत्र उप्पीन, पालक प्रतिनिधी म्हणून श्री तेगा पिदा पावरा , श्री  चेतन पावरा तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शाळेच्या बालसंसद विषयी बालसंसदेची पहिली मुख्यमंत्री कुमारी मोगी रमेश पावरा व उपमुख्यमंत्री कुमारी मनीषा अंधाऱ्या पावरा हे आपले सादरीकरण करणार आहेत... तर मॉडरेटर म्हणून ग्यान प्रकाश फाऊंडेशनच्या पल्लवी मुखेडकर मॅडम बोलणार आहेत...

         दुर्गमतेला मात करत सुरू असलेल्या या शाळेला आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरी बारीपाडा  ( उमराणी बु) येथील २९  मुलांची पायपीट आज ही संपलेली नाही..! शाळेने समाजाच्या आदिवासी सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न करताना आदिवासी सण उत्सव यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे... ! संकटे कितीही असले तरी मात करता येते हे केवळ शिक्षणामुळेच याची जाणीव आज पाड्यावर गावात झाली असून शाळा आणि शिक्षण आज पाड्याची  खरी प्राथमिकता बनली आहे..!!

        जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित नेता आणि शिक्षण, आंतरराष्ट्रीय विकास, परोपकार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील चालक शक्ती विकास पोटा https://worldeduweek.org/यांच्या नेतृत्वात जागतिक शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले जाते. 


       जगभरातील संयुक्त शिक्षक , शिक्षणासाठी झटणारे लोकांना  अभ्यासाचे गट, अभ्यास कोपरे, पालकांची जागरूकता सभा, बालसंसद सादरीकरण  म्हणजेच दाखवण्यास काल्लेखेतपाडा टीम उत्सुक आहे...

                   या शाळेच्या संपूर्ण प्रवासात प्राथमिक शिक्षण विभाग, नंदूरबार, मा.  डाएट नंदूरबार, धडगाव तालुक्याचे  मा. गटशिक्षणाधिकारी श्री जयंत चौरे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती,  धडगाव मा. श्री. डी डी राजपूत साहेब ( बिट राजबर्डी) , मा. श्री शिलवंत वाकोडे साहेब ( बिट सिसा),  मा. श्री योगेश सावळे ( बिट मांडवी) व धनाजे केंद्राचे केंद्रप्रमुख मा श्री. बी डी पाडवी साहेब, मा श्रीमती. शोभाबाई फत्तेसिंग पावरा ( पंचायत समिती सदस्य),  उमराणी  ग्रामपंचायत चे सरपंच श्रीमती आशाबाई वंतीलाल पावरा व सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. तेरसिंग पावरा व सर्व सदस्य, तसेच ग्यान प्रकाश फाऊंडेशन चे अशोक पिंगळे सर, मधुकर माने सर, श्री सागर धनेदर सर , पालक, ग्रामस्थ, यांचे अनमोल सहकार्य मिळाले आहे....


 आपण कार्यक्रमास नोंदणी करण्यासाठी  खालील लिंक वर जाऊन  येत्या 8 ऑक्टोबर 2020, दुपारी 13:00 ते दुपारी 14:00 GMT ही वेळ निश्चित करून रजिस्ट्रेशन करावी ... नंतर आपल्याला एक मेल येईल त्यात तुम्हांला लाईव्ह इव्हेंट ची एक लिंक येईल... व त्या लिंक वर क्लिक करून 8 ऑक्टोबर ला सायंकाळी  भारतीय प्रमाणवेळनुसार  6.30 PM: ते 07:30 PM  वाजता मोबाईल, लॅपटॉप, कंप्युटर या साधनांचा वापर करून मायक्रोसॉफ्ट टीम या ऍप किंवा सॉफ्टवेअर वर पाहता येईल... 

जॉईन व्हा..  नाव नोंदवा...  तारीख, वेळ निश्चित करून ठेवा...🙏🏼🙏🏼

नाव नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन लिंक https://worldeduweek.org/

 रजिस्ट्रेशन प्रकिया  युट्युब लिंक https://youtu.be/-1V1l2eQbos

व आपल्याला रजिस्ट्रेशन करताना काही अडचण आल्यास शाळेच्या वरील  युट्युब चॅनल वर क्लिक करून रजिस्ट्रेशन व्हिडीओ पाहता येईल... रजिस्ट्रेशन साठी काही अडचण आल्यास  श्री रुपेशकुमार नागलगावे - 9423893709, श्री लक्ष्मीपुत्र उप्पीन - 9373307560 व श्री सागर - 9975978706 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा... 

शाळेच्या खालील फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंकडीन, ट्विटर पेज वर जाऊन  Like, Share, Comment नक्की करा...

 @टीम काल्लेखेतपाडा*

➡️https://twitter.com/zpkallekhetpada?s=09

➡️https://www.instagram.com/z_p_school_kallekhetpada?r=nametag

➡️https://www.linkedin.com/in/z-p-school-kallekhetpada-tal-dhadgoan-4a843a1b7

➡️https://lm.facebook.com/zpschoolkallekehtpada

Post a Comment

0 Comments