तणावावर संगीताची मात्रा
करोना काळात नागपुरातील सामान्यांचा ताणतणाव दूर करायला फेसबुक लाइव्ह संगीत कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार प्रत्येक आठवड्यात हे डॉक्टर कलावंत आपल्या सुरेल आवाजाची रसिकांना मेजवानी देत असतात. हा कार्यक्रम बघणाऱ्यांची संख्या आता दोन हजारांवर गेली आहे. उपराजधानीतील सुपरस्पेशालिटीया शासकीय रुग्णालयात गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया करणारे डॉ. निकुंज पवार यांनी काही डॉक्टरांना बरोबर घेऊन स्वर डॉक्स हा प्रत्येक आठवड्यात शनिवारी रात्री ८ ते ९दरम्यान एकतासांचा फेसवुकलाइव्ह कार्यक्रम सुरू केला. त्यासाठी स्वत:च्या घरातच त्यांनी सर्व साहित्य स्वखर्चाने उपलब्ध केले. गाणे म्हणण्यासाठी प्रत्येक आठवड्याला दोन नवीन डॉक्टर असतात. या कार्यक्रमातून ते नागरिकांना करोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी आवश्यक काळजीबद्दलही माहिती देतात. या उपक्रमाशी नागपूरचे सुमारे २० डॉक्टर कलावंत जोडले गेले आहेत
0 Comments