आदिवासी लोककलावंत (सोंगाडया) यांना आर्थिक मदत मिळणेबाबत निवेदन....
नंदुरबार जिल्हयातील “आदिवासी रोडाली लोककला महासंघ, नंदुरबार ' या कलाकारांच्या वतीने अध्यक्ष श्री.नामदेव गिरज्या वळवी (नामुसोंगाडया) यांनी निवासी उपजिल्हाधिकारी बबन काकडे याना दिलेल्या निवेदनात आपली मागण्या मांडल्या की,महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयातील सोंगाडया हा लोककला प्रकार अतिशय लोकप्रिय असुन स्वातंत्र्यानंतर म्हणजे सन १९५० पासुन या सोंगाडया कलाकारांकडुन समाज प्रबोधनाचे कार्य गावोगावी केले जातात.
काय आहे आदिवासी लोककलावंत (सोंगाडया)...
नंदुरबार जिल्हयासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजामध्ये १५ ते २० कलाकारांचा समुह खुल्या रंगमंचावर रात्रौच्या सुमारास समाज प्रबोधनपर नाटीका, गीते सादर करतात.
साधारणतः किती लोककलावंतांचा उदरनिर्वाह चालतो...
अशाप्रकारे जिल्हयात ६०० ते ७०० लोककलावंत हे सोंगाडया कलाकार म्हणुन कार्यक्रम आयोजकांकडुन मिळणाऱ्या तटपुंज्या मानधनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात.
कश्या प्रकारे लोककलावंत कला सादर करतात...
सदरचे सोंगाडया कलाकार हे समाजातील
- वाईट व अनिष्ट रुढीबाबत समाजात जनजागृती करतात
- त्याचप्रमाणे शासनाने काढलेल्या योजना या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचेही कार्य करतात
- बालविवाह
- अंधश्रध्दा
- व्यसनमुक्ती शेतीची भांडणे
- बहुपत्नीत्व, अनैतिक संबंध
ज्या आदिवासी लोककलावंतांनी आपले उभे आयुष्य समाज प्रबोधनासाठी घालविले अशा कलाकारांना विस्मरुन चालणार नाही. जिवनाच्या पडदयाआड गेलेल्या कलाकारांचे पुतळे, स्मारक अथवा संग्रहालय बाजारपेठेत उभे केल्यास संस्कृती व लोककला जिवंत राहील तसेच येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल संपुर्ण आदिवासी समाजात सहनशिलता, नम्रता व इमानदारी ही जन्मजात असल्याने या समाजातील लोककलावंतांनी कधीही आपल्या हक्कासाटो तसेच पुरक मागण्यांसाठी कधी आंदोलन अथवा मोर्चा धरणे काढल्याचे ऐकवित नाही.
शासनाने नंदुरबार जिल्हयातील सर्व आदिवासी सोंगाडया कलावंतांना शासन स्तरावर योग्य ती आर्थिक मदत दयावी. अशा कलाकारांनी आर्थिक मदतीचा हात दिल्यास त्यांच्यातील उत्साह वाढेल अन्यथा आदिवासी सोंगाडया कलावंत यांचे उपासमारीचे बळी जातील. तरी आदिवासी सोंगाडया कलावंतांना योग्य ती आर्थिक मदत मिळण्याकरीता आपल्यामार्फत शासनाकडे योग्य तो अहवाल सादर करण्यात यावा अशी विनंती आहे.
अध्यक्ष-आदिवासी रोडाली लोककला महासंघ, नंदुरबार (राष्ट्रीय कार्यालय नंदुरबार) ता.जि. नंदुरबार या संघटनेतील सभासद अध्यक्ष : .नामदेव गिरज्या वळवी(नामु सोंगाडया) उपाध्यक्ष : श्री.राजु छगन गावीत कार्याध्यक्ष : श्री.अनशिल देविलाल गावीतसत्यपाल वलवी सरपंच यांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी याना देण्यात आले
0 Comments