हाथरस बलात्कार प्रकरण सीबीआयही केंद्रातल्या मर्जीनुसार काम करीत असल्याने न्यायालयीन चौकशी व्हावी अशी वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्ह्याच्यावतीने मागणी..

 हाथरस बलात्कार प्रकरण सीबीआयही केंद्रातल्या मर्जीनुसार काम करीत असल्याने न्यायालयीन चौकशी व्हावी अशी वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्ह्याच्यावतीने मागणी..



             उत्तर प्रदेशात वाल्मिकी या अनुसूचित जातीतील युवतीची क्रुर हत्या करण्यात आली आहे. या घटनेने देश हादरुन गेला आहे. या घटनेत देशात आजही मनुवादी विचारसरणी, सनातनी कट्टरवादी शक्तीचा वावर सुरु असल्याचे लक्षात येते. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने जरी सीबीआय चौकशीची घोषणा केली असली तरी सीबीआय संवत्र यंत्रणा राहिलेली नाही तर ती सत्ताधारी आणि प्रधानमंत्री मोदी सरकारचे हाताचे बाहुले बनले आहे. त्यामुळे या पिडीत कुटूंबियांच्या मागणीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाच्या अखत्यारीत ही चौकशी झाली पाहिजे. तसेच सदर घटना ही बलात्कार नसून केवळ शारिरीक छळ होता असे दाखविण्याचा योगी सरकारचा प्रयत्नाचा आम्ही निषेध करीत आहोत. या घटनेत जी लोकं अडकलेली आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करीत आहोत.

देश आज कठीण परिस्थितीत जात आहे. कोरोना या महाभयंकर आजाराने ग्रस्त असलेले वंचित समुहातील जनतेला घटनात्मक तरतुद असतांना जीवन जगण्याच्या हक्कासाठीझगडावे लागते आहे. उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेने शरमेने मान खाली जाते कारण त्या दलित मागासवर्गीय मुलीवर अत्याचार झाला. तरी मार्ग जातीतील आरोपी मोकाट असतांना योगी आदित्यनाथ कुणाला संरक्षण देत आहेत. या कृतीचा निषेध करतो या घटनेचा आणि आरोपींना लवकर अटक व कठोर फाशी देण्यात आली पाहिजे. न्यायालयीन चौकशी झाली अशी पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्ह्याच्यावतीने करीत आहोत. निवेदनात  अरूण रामराजे, जिल्हाध्यक्ष उद्धव पिंपळे  प्रकाश जाधव, दिनेश समुद्रे, गौतम इंदवे,राजकुमार गोसावी, पंकज जाधव ईश्वर पिंपळे  आदींच्या  स्वाक्षऱ्या आहेत 

यावेळी जिल्हाधिकारी  कार्यालय  प्रवेश द्वार समोर निदर्शने करण्यात आले 

Post a Comment

0 Comments