जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार रघुनाथ गावडे यांनी स्वीकारला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार रघुनाथ गावडे यांनी स्वीकारला.

नंदुरबार जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी त्याचे सत्कार करताना प्रभारी मु. का. अ. शेखर रौंदळ सोबत उपमु. का. अ.भूपेंद्र बेडसे 

 

नंदुरबार:- रघुनाथ गावडे हे उपआयुक्त सामान्य प्रशासन विभागिय आयुक्त नासिक येथे कार्यरत तसेच सिहस्थ मेळाव्याचे मुख्य मेळा अधिकारी मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते लोकडउन चा काळात त्यांनी त्यांनी कामगिरी बजावली असून  नंदुरबारचे नूतन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार रघुनाथ गावडे यांनी घेतला.  त्याचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार प्रभारी मु. का. अ. शेखर रौंदळ यांनी केला  यावेळी उप. मु. का. अ.भूपेंद्र बेडसे हे हि उपस्तित होते  तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख समस्या सोडविण्यासाठी नियोजबद्ध पद्धतीने विभागाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या जनसामाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असणार असल्याचे देखील यावेळी सांगितले तसेच  या जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्रमुख समस्या कडे लक्ष देऊन याभागातील रस्ते आरोग्य शिक्षण व रोजगाराच्या असणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे साठी प्रयत्न करू असे नूतन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले 


Post a Comment

0 Comments