बाल गोपालांनी साकारला वनराई बंधारा....
धडगांंव : जलसाक्षरता केंद्र यशदा पुणे अंतर्गत जलसाक्षरता समिती ता अक्राणी यांच्या तर्फे नाल्यातुन वाहुन जाणारी बहुमोल माती आणि पावसाळ्या नंतर आटणारे नाले यांवर प्रतिबंध घालण्यासाठी वनराई बंधारा निर्मिती आवश्यक असल्याचे जलप्रेमी प्राचार्य डाॅ एच एम पाटील यांनी गावकर्यांना प्रबोधन करतांना सांगितले. या साठी तालुकास्तरीय जलदुत ब्रिजलाल पटले, मानसिंग वळवी प्रा डाॅ हरीभाऊ पवार, प्रा अनिल शिंदे यांंनी संयोजन करुन वनराई बंधार्यासाठी प्रयत्न केलेत. मांडवी बु येथील रुणमालपाड्याच्या नाल्यावरवनराई बंधारा तयार करण्यात आला. वाळुच्या तीनशे गोण्या, दगड व माती आदिंच्या सहाय्याने सदर बांध घालण्यात आला. दीड ते दोन किलो मिटर अंतरावरुन पाण्यासाठी येणार्या बांधवांचे तथा गुरांच्या पाण्याचा , दुबार पीक घेणार्यांचा प्रश्न मार्च ते मे या कालावधीत बिकट होतो. परंतु या नाल्यामुळे ती समस्या सुटण्यास मदत होउल असे बाज्या पटले यांनी मनोगतात सांगितले. या प्रसंगी पोलीस पाटील संतोष मोरे,वसंत पटले, आदल्या वळवी,जयसिंग वळवी आदि उपस्थीत होते.नोमा पावरा,अजित मोरे,नानसिंग पटले,विरसिंग पटले, राहुल मोरे,रितेश पटले,सागर पटले,मोग्या पटले,सुवित्रा वसावे, वैशाली गेंद्रे,मेघा पटले,प्रमिला वळवी,रोशन वसावे,अमित पटले आदिनीं श्रमदानात सहभाग घेतला.
0 Comments