खोडाई माता मंदिराचे बाहेरून दर्शन खुले करावे:नगरसेविका हर्षा बाफना

 खोडाई माता मंदिराचे बाहेरून दर्शन खुले करावे:नगरसेविका हर्षा बाफना



खोडाई माता मंदिराचे बाहेरून दर्शन खुले करावे, अशी मागणी  नगरसेविका हर्षा बाफना यांनी केली आहे. याबाबत आज तहसीलदारांना य निवेदन देण्यात आले.

  •  निवेदनात काय  म्हटले आहे ... 

नंदुरबार शहरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या खोडाईमाता मंदिराचा परिसर  बंद करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आपण या मंदिराकडे गेलात तर लक्षात येईल की हे मंदिर खुले आहे, मंदिराला दरवाजा नाही. रस्त्यावरून जाता येता नाही भाविकांना सहज दर्शन करता येणे शक्य आहे. असे असताना केवळ मंदिरात प्रवेश करू देऊ नये या नावाखाली पोलिस प्रशासनाने महसूल विभागाच्या आदेशान्वये भाविकांना मंदिरात परिसरात जाण्यासही मनाई केली आहे. वास्तवात मंदिराच्या परिसरात जाण्यास कुठेही मनाई नाही. विशेषतः रस्ता बंद करण्याची आवश्यकता नाही.मंदिराला बंद करायचे तर मंदिराच्या बाजूला बेरी कटिंग करण्यात यावे जेणेकरून कोणीही भाविक परवानगीशिवाय मध्ये जाणार नाही. याबाबत आमचे काहीही दुमत नाही. मात्र केवळ हट्टापायी भाविकांना मंदिराच्या दर्शना पासूनही उंची ठेवण्यात येत आहे ही बाब अयोग्य ठरते. प्रशासनाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो मात्र भाविकांच्या श्रद्धेचा आपणही आदर करावा नवरात्राची तिसरी माळ संपत आली तरीही भाविकांना दर्शन घेता येत नाही.याबाबत विनाकारण प्रशासनाविषयी भाविकांच्या मनात अनादराची भावना निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेत मंदिराला बेरी कटिंग करण्यात यावे मन मात्र मंदिराच्या परिसरातून जाये करून भाविकांना दर्शनासाठी बनाई करण्यात येऊ नये.

जर अशी मनाई असेल तर आठवडे बाजार सुरू करताना त्यातून कोरोना पसरणार नाही काय. असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण होत आहे. शासनाने मंदिराच्या प्रवेशाला आणि दर्शनाला मनाई केली आहे. बाहेरून दर्शन घेण्यास श्रद्धा व्यक्त करण्यास कुठेही मनाई केलेली नाही ही आणि असा प्रकार करण्याचा आपणास देखील अधिकार नाही.

तातडीने या मंदिराची अनावश्यक बॅटिंग काढण्याचे आदेश देण्यात यावेत अन्यथा भाविकांचा उद्रेक होऊ शकतो ही बाब लक्षात घ्यावी अशी आपणास आम्ही विनंती करीत आहोत.

भगिनींना येथूनच दर्शन घ्या असे दरडावून सांगणे, हे योग्य ठरते. यात तेथे नियुक्त केलेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही. आपल्या सारख्या वरिष्ठ पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य तो निर्णय वेळीच घेणे आवश्यक आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेली दुर्गा दौंडच्या भाविकांना देखील रस्त्यात बसून नतमस्तक व्हावे लागते. योग्य त्या ठिकाणापर्यंत बेरी कटिंग करावे अशी ठाम मागणी आम्ही करत आहोत

आई जगदंबा, खोडाईमाता आपणास सद्बुद्धी देईल आणि आपण योग्य तो आदेश द्याल याची आम्हाला खात्री आहे. निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी मनीष बाफना, श्याम बांगड, प्रितिष बांगड उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments