कृषि मित्रांकडून शेतकरी व व्यावसायिकांना मार्गदर्शन.
नंदुरबार : शासकीय महाविद्यालय नंदुरबार येथील कृषि मित्रांनी साक्री येथील गुरुदत्त ओईल मिल येथे प्रत्यक्ष व्यवसायकाला भेट दिली. कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी संप्रिया कोकणी, दामीनी बागूल, सुमित गायकवाड यांनी कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कृषिमित्रांनी गुरूदत्त ओईल मिलमिल मध्ये जाऊन तेथिल कार्यापध्दतीचा आढावा घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली, तेथील मिल चालक व कार्मचारी यांच्याकडून तेलबियांवर प्रक्रिया करून कशाप्रकारे शेतकरी आपल्या उत्पादनात वाढ करु शकतात याबद्दल माहिती जाणून घेतली.
ह्या कृषि विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. बी. खरबडे व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments