नंदुरबार -महाराष्ट्र तील ठाकरे सरकार विरोधात भाजपचे आंदोलन ...
नंदुरबार महाराष्ट्र तील ठाकरे सरकार विरोधात भाजपचे आंदोलन |
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या एक देश एक बाजारपेठ या संकल्पनेमुळे देशातील शेतकरी आर्थीक दृष्टया सक्षम होणार असुन शेतकरी आपला माल आता देशात कुठेही विकु शकतो त्यामुळे त्याचा कष्टाच्या शेतीमालाला मुबलक दाम मिळणार असल्याने भयभीत झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शीवसेना महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या बिलास राज्यात केंद्राच्या कायदयाचा अंमलबजावणीस स्थगीती दिली आहे ही बाब शेतकरी विरोधी असुन महाआघडी सरकारच्या शेतकरी विरोधी आदेशाचा आम्ही होळी करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी सांगीतले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुकारलेल्या आंदोलना प्रसंगी विजय चौधरी बोलत होते. आपल्या भाषणात विजय चौधरी पूढे म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकरी हिताचे अनेक ऐतीहासीक निर्णय घेतले त्यात एक देश एक बाजारपेठ हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा कल्याणाचा आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देखील एक देश एक बाजारपेठ या संकल्पनेचा उल्लेख केला होता. मात्र तीच काँग्रेस आता शेतकरीहिताच्या नीर्णयाला विरोध करीत असल्याचे दुदैवी असल्याचेविजय चौधरी यांनी या प्रसंगी म्हटले. याप्रसंगी केंद्र सरकारचा निर्णयविरोधारत स्थगीती देणाऱ्या महावीकास आघाडीसरकारच्या निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी महावीकास आघाडी निषेध असो भारतीय जनता पार्टीचा जिंदाबाद भारत माता की जय अश्या घोषणा देण्यात आल्या
.
केंद्र सरकारच्या कृषी अध्यादेशाचे राज्यात अंमलबजावणी करणारे परीपत्रकाला राज्य सरकारने स्थगीती दिली. राष्ट्रवादीचे नेते शशीकांत शींदे यांच्या अपीलावर सहकार वर पनन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारच्या आदेशाला एकापरीपत्रकान्वये स्थगीती दीली या निर्णयाचा विरोधात भाजपाचे राज्यभर आंदोलन पुकारले आहे. आज बुधवारी नंदुरबार येथे कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारात स.11.00 भाजपा तर्फे निषेधआंदोलन करण्यात आले
याप्रसंगी प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, संगठन जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधाभाई पटेल, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष सुदाम पटेल, संजय साठे, सतीश पाटील, संजय पाटील, नरेंद्र पाटील, पंकज पाटील, अरुण पाटील, प्रशांत पाटील, विजय नाईक उपस्थित होते.
0 Comments