आरपीआय आठवले युवक आघाडी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी मिळाल्याबद्दल जल्लोष
नंदुरबार तालुका विधानसभा आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांचे मानले विशेष आभार.........
नंदुरबार=: लोकसभा निवडणुकी दरम्यान नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांनी नंदुरबारच्या जनतेला जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे बाबत अभिवचन दिले होते. ते अभिवचन त्यांनी पूर्ण करून दाखविले. नंदुरबार जिल्हा निर्मिती झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे वैद्यकीय शिक्षण नंदुरबार जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याबाबत नंदुरबार तालुका विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री विजयकुमार गावित सातत्याने प्रयत्नशील होते. अनेक वर्षापासून त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे बाबत राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. नंदुरबार जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन यात २०२०/२१ या शैक्षणिक वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांना एम बी बी एस च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. त्याबद्दल नंदुरबार तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांच्या सत्कार करून आभार मानण्यात आले व त्यांच्या निवासस्थानी आर पी आय युवक आघाडी आठवले गट भाजपा युवा मोर्चा वतीने फटाके फोडून व मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आला.
यावेळी आरपीआय आठवले युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, आरपीआय जिल्हा सरचिटणीस राम साळुंके भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन भाई खानवानी, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार, नगरसेवक संतोष भाऊ वसईकर, लक्ष्मण भाऊ माळी, प्रा. धामणे सर, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील,भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निलेश भाऊ चौधरी, किरण पाटील सर मिलिंद मोहिते, भाजपाचे ज्येष्ठ नेते मानिक भाऊ माळी, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे नरेश कांकरीया, भाजपा भटके-विमुक्त सेलचे चंद्रकांत भोई ,आरपीआय युवक शहराध्यक्ष सुलतान मंसूरी, गणेश शिरसाट, गौतम पानपाटील, जितेंद्र खवळे, विजय खवळे, आरपीआय रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी, आरपीआय चे मितुल शाह, युवराज राजपूत आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
ReplyForward |
0 Comments