हजरत मोहम्मद पैगंबर साहेब जयंतीनिमित्त राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल तर्फे जिल्हा रूग्णालयात फळ वाटप...
नंदुरबार: हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अल्पसंख्यांक सेल तर्फे जिल्हा रूग्णालयात फळ वाटप जिल्हाध्यक्ष जाकीर मियाॅ जागीरदार यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद पैगंबर साहेब जयंतीनिमित्त मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अल्पसंख्यांक सेलतर्फे सामाजिक बांधिलकीतून जिल्हा रूग्णायलातील रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष कालू पहेलवान, उपाध्यक्ष लाला बागवान, सचिव जब्बार शेख गनी, ज्येष्ठ पदाधिकारी युनूस पठाण, आसिफ शेख, सलीम बागवान, शकील गुरू, ईबा बागवान, इसराईल बागवान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments