काळया ज्वारीचे पंचनामे करुन शासन खरेदी लवकर करा व पणन महासंघाव्दारे कापूस खरेदी लवकरात लवकर सुरु करा-भाजप

                                                भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार

 निवेदन देताना भाजपा जिल्हाध्यक्ष श्री विजय भाऊ चौधरी, खासदार हिनाताई गावित, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बुधा भाई पाटील, किसान मोर्चा उपाध्यक्ष दशरथ भाई चौधरी, किसान मोर्चा सरचिटणीस सतीश पाटील, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस शरद जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र लाहोटी, भटके-विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र धनगर 


 नंदूबर -दि.  २ नोव्हेंबर २०२० रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार तर्फे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भारूड  यांना 
१. काळ्‍या ज्वारीचे पंचनामे करून शासन खरेदी  लवकर करणे बाबत. 
  २. पणन महासंघ द्वारे कापूस खरेदी लवकर सुरू करणेबाबत निवेदन देण्यात  आले.

     यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मुंग, उडीद, सोयाबीन यासारखे पीके सडून गेली. त्याचप्रमाणे ज्वारीच्या पिकावर शेतकऱ्यांची मदार होती ती ज्वारी सुद्धा काळी पडली त्यातल्या त्यात जास्त पावसामुळे ज्वारी पिकाचे उत्पन्न फारच कमी झाले जिथे ज्वारी एकरी २० ते २५ क्विंटल उत्पन्न यायला पाहिजे होते तेथे फक्त 8 ते 10 क्विंटल उत्पन्न आले. ज्वारी काळी पडल्यामुळे खाजगी व्यापारी १००० ते ११०० रुपये भावाने खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या फारच हाल झाले आहेत ज्याप्रमाणे कोरूना काळामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्या सत्कार झाला कारण त्यांनी देशातील जनतेची सेवा केली परंतु बळीराजाने सुद्धा उन्हातानात उभे राहून अन्नधान्य भाजीपाला दुध यांचे उत्पन्न तयार करून जगाला पुरविले एका प्रकारे त्यांनी सुद्धा करू नये योद्धा म्हणून देशाची सेवा केली. परंतु अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरपाईला शासनाने हेक्टरी 10 हजार रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली म्हणून शासनाने काळी ज्वारी चे लवकरात लवकर पंचनामे करून त्वरित शासन खरेदी करण्यात यावी.

     तसेच कपाशी सुद्धा पहिला बहार शेतकऱ्यांना ३ ते ४ क्विंटल उत्पन्न आले. परंतु नंतर बोंड आळी आल्यामुळे उत्पन्न सुद्धा कमी येणार आहे कापसाच्या एकरी खर्च बघता शेतकऱ्यांना आज खिशातून पैसे टाकण्याची वेळ आली आहे पुढील काही काळामध्ये बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यातल्या त्यात खाजगी व्यापारी कापसाला प्रति क्विंटल ३ ते४ हजार रुपये भाव देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चही निघत नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपणास विनंती की, पणन महासंघ द्वारे कापसाची खरेदी करून शेतकऱ्यांना जीवन मिळावे प्रतिक्विंटल ६ हजार रुपये भाव मिळावा.
     एकंदरीत पाहता यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे बागायती पिके सुद्धा ऊस केळी पपई मिरची कापूस यांचे फारच नुकसान झाले आहे त्यामुळे सर्व शेतकरी अडचणीत आले आहेत तरी शासन दरबारी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहता तात्काळ कापूस खरेदी केंद्र सुरु करावे अन्यथा भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.
     यावेळी निवेदन देताना भाजपा जिल्हाध्यक्ष श्री विजय भाऊ चौधरी, खासदार हिनाताई गावित, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बुधा भाई पाटील, किसान मोर्चा उपाध्यक्ष दशरथ भाई चौधरी, किसान मोर्चा सरचिटणीस सतीश पाटील, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस शरद जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र लाहोटी, भटके-विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र धनगर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments