मिशन बिगीन अगेन अंतर्गत हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी रात्री 10 पर्यंत परवानगी

मिशन बिगीन अगेन अंतर्गत  हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी रात्री 10 पर्यंत परवानगी


नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 12: ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत हॉटेल, फुड कोर्टस, रेस्टॉरंटस आणि बार यांचेसाठी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत  सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.


यापूर्वी हॉटेल्स व बारसाठी सायंकाळी 7 पर्यंत परवानगी देण्यात आली होती. उर्वरीत सर्व वाणिज्य प्रकारच्या आस्थापना, मार्केट, दुकाने यापुर्वी दिलेल्या आदेशामध्ये नमुद केल्यानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील. औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास अनुमती राहील.


सर्व आस्थापनांनी तसेच नागरीकांनी कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वे ,आदेश तसेच सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. 


हॉटेल, फुड कोर्टस, रेस्टॉरंटस आणि बार बाबीसाठी दिलेली मुभा प्रतिबंधीत क्षेत्र वगळता आहे. हे आदेश संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरीता लागू राहील. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments