सहकारातून समृद्धीची दिशा देणाऱ्या कारखान्यास शेतकऱ्यांनी ऊस द्यावा! सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांचे आवाहन ...
आज असंख्य अडचणींचा सामना करीत सातपडा साखर कारखाना सुस्थितीत सुरु आहे.कोणी कितीही भूलथापा देत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करुन सहकारातून समृद्धीची दिशा देणाऱ्या आपल्या हक्काच्या कारखान्यास शेतकऱ्यांनी ऊस द्यावा, असे आवाहन सातपडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी केले.
येथील सातपुडा साखर कारखान्याच्या ४६ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील,कऊबाचे चेअरमन सनिल पाटील,खविसंचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील,माजी पं.स सभापती दरबारसिंग पवार,साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर,सुतगिरणीचे ज्येष्ठ संचालक माधव पाटील,माजी नगरसेवक के. डी.पाटील,खविसंचेमाजीचेअरमन विजय पाटील,माजी नगराध्यक्ष विजय पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना पाटील म्हणाले की,अडचणी भरपूर असल्या तरी कारखाना सुस्थितीत सुरु राहणार आहे.कारखाना शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे शेतकर्यांनी कारखान्यालाच ऊस दिला पाहिजे. रिकाम्या लोकांच्या नांदी न लागता कारखान्यासोबत रहावे.लोकांच्या नांदी न लागता आपल्याला सरळ मार्गी चालायचे आहे.कारखान्या बाबतीत वेडेवाकडे बोलणारांचे ऐकून घेवू नका. परिस्थिती नसार बदल करावा लागणार आहे यासाठी वाईट काळ संपण्याची वाट पहावी लागणार आहे.वाईट काळ संपल्यानंतर चांगल्या दिवस येणार आहेत.त्यामुळे आशेचा किरण कायम तेवत ठेवावा.विश्वासावर हा कारखाना सुरु आहे. प्रास्तविकात कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर.पाटील म्हणाले की, शाश्वत पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जात असून १९ हजार एकर ऊसाची लागवडझाली आहे.साडेपाचलाख टन ऊसाचे गाळपाचे उद्दीष्ट आहे. कोरोनामूळे आर्थिक संकट कोसळले तरी कामगारांना वेळेवर वेतन देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.गळीत हंगामाची परवानगी शासनाने दिली आसून महिना अखेर हंगाम सुरु करण्याचा कारखान्याचा प्रयत्न राहिल.विना थांबता हंगाम पार पाडण्यासाठी कामगारांनी प्रयत्न करावे.पुढील गाळप हंगाम १६० दिवस चालेल. कारखान्या संदर्भात वावळ्या उठविल्या जात असून याकडे दर्लक्ष करावे.कारखाना सुस्थितीत आहे ,कारखाना पूर्णक्षमतेने सुरु राहणार आहे यात शंका बाळग नये. दरम्यान कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व जि.प.सभापती जयश्री पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ करण्यात आला.
0 Comments