नंदुरबार आगारातर्फे ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस सुरु...
नंदुरबार - राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे दि.१२ ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धुळे विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ यांच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात २३ गावांसाठी फेर्याचे नियोजन असून लवकरच दुसर्या टप्प्यातील बसेस सोडण्यात येणार आहेत अशी माहिती नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली.
धुळे विभागातील नंदुरबारसह विविध आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस पुर्ण क्षमतेने सुरू झाल्या मात्र ग्रामीण भागाची जीवनवाहनी ठरलेली लालपरी गेल्या सहा महिन्यापासून खेडे गावापर्यंत पोहचली नव्हती. याबाबत नंदुरबार तालुका ग्राहक पंचायततर्फे तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी ग्रामीण एसटी बसेस सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
बसेस वेळ तक्ता....
- नंदुरबार-खेतिया दुपारी १२.३० वाजता
- नंदुरबार-नाशिंदा दुपारी ४.३० वाजता दहिंदुला मार्गे
- नंदुरबार-तलवाडे सायंकाळी ७ वाजता
- नंदुरबार-शिरपूर सकाळी ७.१५ वाजता
- शिरपूर-नंदुरबार सकाळी ९.४५ वाजता
- नंदुरबार-खोलघर दुपारी १२ वाजात
- खोलघर-नंदुरबार दुपारी १ वाजता
- नंदुरबार-नाशिंदा दुपारी २.१० वाजता कोळदा मार्गे
- नंदुरबार-हरणीपाडा सायंकाळी ५.३० वाजता
- नंदुरबार खोलघर सायंकाळी ७ वाजता
- नंदुरबार-नाशिंदा दुपारी ३.४५ वाजता खोंडामळी मार्गे
- नंदुरबार-केवडीपाडा सकाळी ९ वाजता
- नंदुरबार-हरणीपाडा सकाळी १०.२० वाजता
- हरणीपाडा-नंदुरबार सकाळी ११ वाजता
याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील ग्रामीण भागात लालपरी अर्थात एसटी बसेस पुर्ण क्षमतेने धावणार आहेत. प्रवाशांनी खासगी प्रवाशी वाहतूकी ऐवजी एसटी महामंडळाच्या बसेसद्वारे सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन धुळे विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ व नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.
0 Comments