नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद-आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन ( माडा ) जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड याना देताना आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्ष
डॉ.राजेश वळवी, डॉ.स्वप्नील गावित, निलेश वळवी
नंदुरबार जिल्हा हा आदिवासी, दुर्गम व ८० % गरिबी रेखा खालील असलेला जिल्हा आहे. महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन ( माडा ), हि सामाजिक संघटना आरोग्य विषयी सेवा करते.
गेल्या महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. खरतर ह्या नवीन मशीन ला वर्ष सुद्धा झालेले नाही आणि १६ slices चे एकमेव मशीन जिल्ह्यात आहे, असे असतांना मशीन वारंवार खराब होणे म्हणजे जिल्यातील गोरगरीब जनतेवर अन्याय आहे. आधीच जिल्हा करोनाने ग्रासलेला आहे त्यात छातीचा सिटी स्कॅन निदानासाठी आवश्यक असल्यामुळे लोकांना बरेच हजार रुपये खाजगीत मोजावे लागतात, वरून इतर खर्च.
जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांच्याशी चर्चा करताना आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्ष डॉ.राजेश वळवी, डॉ.स्वप्नील गावित, निलेश वळवी
महोदय आपणास जिल्यावासियाकडून कळकळीची विनंती की, आपण स्वतः यात लक्ष्य घालून मशिन लवकरात लवकर दुरुस्त करावयास आदेश द्यावे अशी मागणी महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोशिअशन ( माडा ) करीत आहे डॉ.राजेश वळवी, डॉ.स्वप्नील गावित, निलेश वळवी
0 Comments