शिक्षक आपल्या दारी ज्ञानगंगा घरोघरी" विखरण विद्यालयाचा उपक्रमाला उत्तम प्रतिसाद.....
शिकविताना शिक्षक |
नंदुरबार (प्रतिनिधी) :- तालुक्यातील विखरण येथील श्री.आप्पासो. आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालयाने ऑफलाइन शिक्षण 1 जुलै 2020 पासून अविरत सुरू केले असून, ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही, मोबाईल रेंज व्यवस्थित कनेक्ट होत नाही, मोबाईलला इंटरनेट सुविधा नाही, अशा विखरण परीसरातील गावांतील ज्या गावांमध्ये covid-19 चे पेशंट नाहीत, अशा गावांतीत विद्यार्थ्यांना देऊळ, समाज मंदिर, देवालयाचा परिसर, देवालयाचे सभामंडप यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
विद्यार्थ्यांचे तापमापक यंत्रच सहाय्याने तापमान मोजताना शिक्षक |
गावातील पालकांच्या संमतीने, covid-19 चे सर्व आदेश पाळून सोशल डिस्टिंक्शन, प्रत्येक विद्यार्थ्यांना माक्स, सॅनिटायझर, तापमापक यंत्र या साहित्यांचा उपयोग करून विद्यार्थी ऑफलाइन मार्गदर्शन वर्गास हजर राहत आहेत. विद्यालयातील ऑफलाइन वर्गात हजर असलेल्या गरीब व होतकरू इ.5 वी ते 7 वी वर्गातील विद्यार्थ्यांना विद्यालयाने तयार केलेली अभ्यासिका पुस्तिका संच गृह कार्यासाठी भेट देण्यात आले.
अभ्यास करताना विद्यार्थी व शिक्षक |
तसेच इ.8 वी ते 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका पुस्तिका तयार करण्याचे कामकाज विद्यालयातील शिक्षकांमार्फत सुरू असून, लवकरच त्याही वर्गांतील होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासिका पुस्तिका भेट देण्यात येतील. या कामी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.डी.साळुंके, श्री. के.पी.देवरे, श्री.डी.बी.भारती, श्री. एम.डी.नेरकर, श्री.वाय.डी.बागूल परीश्रम घेत आहेत.
0 Comments