वनवासी विद्यालयात म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती आॅनलाईन साजरी
वनवासी विद्यालय व एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा येथे २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आॅनलाईन उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बी.एम.निकुंभ,प्रमुख अतिथी म्हणुन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.व्ही.जी.महाले उपस्थित होते. पर्यवेक्षिका गांगुर्डे मॅडम ,जूनियर विभाग प्रमुख आर डी सोनवणे , वनवासी प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापिका सौ.चारिता पाटील , विद्यालयावर प्रेम करणारे ग्रा.प.सदस्य चिंचपाडा श्री.राजू गोमा वसावे , युवा नेतृत्व श्री.राहुल रमेश वसावे,ग्रा.प.सदस्य, चिंचपाडा हे उपस्थित होते.
वनवासी विद्यालयात महात्मा गांधी यांची जयंती व माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांची जयंती गुगल मीट या ॲप वर ऑनलाइन घेण्यात आली. याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी म्हणून डी. एल. कुलकर्णी व विद्यार्थी मनोगतात सृष्टी प्रमोद चिंचोले, तेजस्विनी गावीत, नवनीत चिंचोले, अंकुश वळवी, अंजली पवार ,निर्जरा गावीत या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्याचबरोबर प्रमुख अतिथी विद्यालयाचे माजी प्राचार्य महाले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषण विद्यालयाचे प्राचार्य बी. एम. निकुंभ सर यांनी शासनाच्या विविध कार्यक्रमांचा नामोल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.आर .डी. सोनवणे यांनी "साबरमती के संत.".... या भजनाने केले. सूत्रसंचालन प्रा. विकास सपकाळे यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहासभाऊ नटावदकरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी सर्व विद्यार्थी व परिसरातील पालक ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले. वनवासी विद्यालयातील विविध ऑनलाईन कार्यक्रमांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments