महात्मा गांधी जयंती निमित्त तंबाखूमुक्त रैली आयुर्वेदिक काढ़ा .मास्क व सॅनिटायझर विटामिन सी च्या गोळ्या वाटप...

                        

नवनिर्माण संस्था नंदुरबार व जिल्हा परिषद शाळा नावली यांचा उपक्रम
    
 

   महात्मा गांधी जयंती निमित्त नवनिर्माण सर्व समाज हितार्थ  नंदुरबार व जिल्हा परिषद शाळा नावली  येथे विविध विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच्यामध्ये तंबाखूमुक्त रैली गाव स्वच्छता अभियान शाळा परिसर स्वच्छता अभियान तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, विटामिन सी च्या गोळ्या वाटप करण्यात आले तसेच उपस्थित ग्रामस्थांना देखील आयुर्वेदिक काढा याचे वाटप करण्यात आला

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  जिल्हा परिषद सदस्य मा. सुशिला ताई चौरे सरपंच सौ.गौरीताई चौरे,डॉ. प्रा.माधव कदम  पत्रकार रणजित राजपूत  आदर्श शिक्षक विशाल पाटील व निर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री रवी गोसावी नावली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक  सतीश देवरे शिक्षक सुभाष कोकणी ग्रामसेविका श्रीमती  जाधव  मॅडम आदि उपस्थित होते 

         

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनिर्माण संस्थेचे  पदाधिकारी व जिल्हा परिषद शाळा नावली येथील शिक्षक यांनी परिश्रम घेतले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश देवरे  व आभार प्रदर्शन श्री विशाल पाटील सर यांनी केले  यावेळी उपस्थितांना डॉ.प्रा. माधव कदम सर यांनी साने गुरुजींच्या गोष्टी याविषयी तर त्यांना विद्यार्थ्यांना हसत-खेळत मार्गदर्शन केले तसेच तसेच गावातील शिक्षित तरुण श्री संदीप कोकणे यांनी covid 19  च्या काळात शिक्षक  म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना  शिकवण्याची जबाबदारी पार पाडली  त्याबद्दल त्याचे देखील सत्कार  करण्यात आला 

           कार्यक्रमात नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष यांनी तंबाखू मुक्त अभियान शाळेत सातत्य राहण्यासाठी करावयाचे प्रयत्‍न याविषयी मार्गदर्शन व  स्वच्छता अभियान काळाची गरज याविषयी देखील मार्गदर्शन केले यावेळी गावात रॅली काढून तंबाखूमुक्त स्वच्छता अभियाना विषयी जनजागृती करण्यात आली . कार्यक्रमाला नावली येथील विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते गावातील सरपंच शाळेतील मुख्याध्यापक ग्रामस्थ यांनी सहकार्य केले .


Post a Comment

0 Comments